शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

'सन्मानामुळे वाढली जबाबदारी, उत्कृष्ट कामगिरीच्या अपेक्षाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 01:31 IST

पद्मश्रीचे मानकरी गौतम गंभीर, सुनील छेत्री, बजरंग पुनिया यांनी व्यक्त केल्या भावना

नवी दिल्ली : गौतम गंभीर क्रिकेटरपासून ‘भला माणूस’ बनू इच्छितो. सुनील छेत्रीमध्ये राष्ट्रीय फुटबॉल संघातून खेळताना आणखी मोठी कामगिरी करण्याची भूक कायम आहे. मल्ल बजरंग पुनिया याने याहून मोठी कामगिरी करण्यासाठी देशवाासीयांचे आशीर्वाद मागितले आहेत.केंद्र शासनाने ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला क्रीडा क्षेत्रातील या दिग्गजांच्या कामगिरीचे कौतुक म्हणून पद्मश्री सन्मान जाहीर केला. या खेळाडूंनी पुरस्कारामुळे जबाबदारी वाढल्याची भावना टिष्ट्वटरद्वारे व्यक्त केली आहे. दोनदा विश्वचॅम्पियन बनलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा सदस्य राहिलेला गौतम गंभीर टिष्ट्वट करीत म्हणाला,‘हा असा सन्मान आहे, ज्याचा आभारासह स्वीकार करतो. या सन्मासोबतच जबाबदारी येते. मी त्या दिवसासाठी जगत आहे, ज्या दिवशी माझ्यातील भला माणूस क्रिकेटपटूला मागे टाकेल तो माझा दिवस असेल. त्या दिवशी मी स्वत:ला पुरस्कृत करेन.’राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार छेत्रीने टिष्ट्वट केले,‘ माझे कुटुंबीय आणि चाहते या सन्मानाचे हकदार ठरतात. मात्र सध्यातरी निवृत्तीचा इरादा नाही. कृतज्ञ होण्याचे आणखी एक कारण मिळाले. अनेक वर्षे साथ देणारे सहकारी खेळाडू, कोचेस, स्टाफ, मसाजर, फिजियो, आणि व्यवस्थापन या सर्वांचा हा पुरस्कार आहे. मला नेहमी प्रेरित करणारे आई, वडील, बहिणी आणि मित्रांना पुरस्कार समर्पित करतो. देशासाठी खेळणे सुरू राहणार आहे. देश आणि क्लबसाठी खेळताना मैदानावर पाय ठेवेन त्यावेळी माझ्यातील चांगल्या कामगिरीची भूक आणखी वाढलेली असेल. दरदिवशी चांगला माणूस बनण्याचे प्रयत्न देखील सुरूच राहणार आहेत.’आशियाई क्रीडा स्पर्धेचा सुवर्ण विजेता मल्ल बजरंग पुनियाने लिहिले,‘ प्रतिष्ठेच्या पद्म सन्मानाने गौरव होणे माझ्यासाठी फार मोलाची बाब आहे. चाहत्यांचे प्रेम आणि माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करणाऱ्यांच्या आशीर्वादामुळे माझ्या हातात हा सन्मान आला.आपल्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी मी आणखी कठोर सराव करणार आहे. मला प्रेरणा आणि आशीर्वाददेत राहा.’ (वृत्तसंस्था)हा सन्मान‘खास’: शरथ कमलदोनदा पद्म पुरस्कारापासून वंचित राहिलेला दिग्गज टेबल टेनिसपटू अचंता शरत कमल याने जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत ‘सुवर्णमय’ कामगिरीमुळे हा सन्मान मिळाल्याचे म्हटले आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी‘खास’ असल्याचे शरत म्हणाला.वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शरत म्हणतो,‘ हा माझा पहिला नागरी सन्मान आहे.काल रात्री बातमी कळली तेव्हा मित्रांसोबत होतो. फोनची बॅटरी डाऊन झाली होती. घरी परतलो तेव्हा आनंदाचे वातावरण होते. मागच्या वर्षीच्या कामगिरीच्या बळावरच हा सन्मान मला मिळू शकला.’जकार्ता आशियाडमध्ये टेबल टेनिसमधील ६० वर्षांचा दुष्काळ संपविताना शरतने जपानला नमवून भारतीय पुरुष संघाला कांस्य जिंकून दिले शिवाय मनिका बत्रासोबत मिश्र दुहेरीचेही कांस्य पटकविले होते. नव्या विश्व टेटे क्रमवारीत शरत सर्वोत्कृष्ट ३० व्या स्थानावर आला. याच महिन्यात त्याने नववे जेतेपद पटकवून राष्टÑीय जेतेपदाचा कमलेश मेहतांचा विक्रम देखील मागे टाकला.

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरSunil Chhetriसुनील छेत्री