जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकण्याचे स्वप्न : लक्ष्य सेन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 10:23 AM2023-08-14T10:23:08+5:302023-08-14T10:23:31+5:30

लय कायम राखून करणार सर्वोत्तम कामगिरी

dream of winning a medal in world championships said lakshya sen | जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकण्याचे स्वप्न : लक्ष्य सेन

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकण्याचे स्वप्न : लक्ष्य सेन

googlenewsNext

गुवाहाटी : आशियाई स्पर्धेत पहिले पदक जिंकणे आणि जागतिक क्रमवारी अव्वल पाच खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्याचे लक्ष्य भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याचे आहे. मात्र, सध्या शानदार कामगिरी कायम राखत राख जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकण्यास त्याचे प्राधान्य आहे.

सेनने खडतर परिस्थितीचा सामना करताना लय मिळवत जुलैमध्ये कॅनडा ओपनचे विजेतेपद पटकावले. त्यानंतर त्याने अमेरिकी ओपन, जपान ओपनच्या उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. अल्मोडा येथे ये राहणाऱ्या या २१ वर्षीय खेळाडूने २०२१मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. २१ ऑगस्टपासून डेन्मार्कमध्ये कोपनहेगन येथे होणाऱ्या स्पर्धेत तो पुन्हा पदक जिंकण्यात यशस्वी ठरेल अशी अपेक्षा आहे.

भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी पीटीआयशी बोलताना सेन म्हणाला की, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी केवळ एक आठवड्याचा कालावधी शिल्लक आहे. गेल्या स्पर्धांमध्ये खेळल्याचा फायदा मला येथे नवकीच होईल. माझी तयारी चांगली सुरू आहे. लय चांगली असली तरी आणखी काही गोष्टी शिकण्याची आणि कामगिरीत सुधारणा करण्यास वाव आहे. नुकतेच मी काही चांगले सामने खेळले असून माझा आत्मविश्वास उंचावला आहे. पुढील एक आठवडा किंवा १० दिवसांत कसून सराव करून जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्याची इच्छा आहे.

चार वर्षांनी होणारी आशियाई स्पर्धा महत्त्वाची

आशियाई स्पर्धा चीनमध्ये हांगझोउ येथे २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. सेनचे या स्पर्धेतही पदक जिंकण्याचे लक्ष्य आहे. तो म्हणाला की, आशियाई स्पर्धा महत्त्वाची असून चार वर्षांतून एकदा होते. अशा प्रकारच्या मोठ्या स्पर्धेत मी दोनदा खेळलो आहे. ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल स्पर्धेत खेळलो आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंना पाहणे, त्यांना भेटणे, त्यांची कामगिरी पाहणे हा माझ्यासाठी चांगला अनुभव होता, त्यामुळे आशियाई स्पर्धेत प्रभावी कामगिरी करण्याची इच्छा आहे. मात्र, सध्या मी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला प्राथमिकता देत आहे. त्यामुळे त्यानंतर आशियाई स्पर्धेवर लक्ष केंद्रित करीन.

 

Web Title: dream of winning a medal in world championships said lakshya sen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BadmintonBadminton