शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

विराट आणि सर्फराज मधले हे साम्य तुम्हाला माहिती आहे का?

By admin | Updated: June 16, 2017 15:15 IST

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद या दोघांमध्ये केवळ आपापल्या संघांचे कर्णधारपद असणे इतकेच साम्य नाही. या दोघांनी आपापल्या देशांना वर्ल्ड कप जिंकून दिलेला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.16- भारताने बांगलादेशला उपान्त्य फेरीमध्ये हरवल्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद या दोघांमध्ये केवळ आपापल्या संघांचे कर्णधारपद असणे इतकेच साम्य नाही. या दोघांनी आपापल्या देशांना वर्ल्ड कप जिंकून दिलेला आहे. 
 
अंडर 19 क्रिकेटमधून विविध खेळाडू नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमावतात. रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये असेच दोन अंडर 19मधून पुढे आलेले आणि संघाचे कप्तान झालेले खेळाडू एकमेकांच्या समोर येत आहेत. 2006 साली श्रीलंकेत झालेला अंडर 19 वर्ल्ड कप पाकिस्तानने  जिंकला होता. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानने भारतीय संघाला पराभूत केले होते. त्यावेळेस पाकिस्तानच्या संघाचे नेतृत्व सर्फराज अहमदने केले होते. पाकिस्तानने हा सामना 38 धावांनी जिंकला होता. त्यानंतर 2008 साली मलेशियामध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये भारताने अजिंक्यपद मिळवले होते. यावेळेस अंतिम सामन्यामध्ये भारताचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होता. 2006 सालच्या वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यामध्ये झालेल्या पराभवाची भरपाई विराट कोहलीच्या संघाने यावेळेस केली. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने अंतिम सामन्यामध्ये 45.4 षटकांमध्ये 159 धावा केल्या होत्या. मात्र प्रतिस्पर्धी दक्षिण अफ्रिकाचा संघ ते आव्हान पूर्ण करु शकला नाही. आता रविवारी हे दोन्ही विजयी कर्णधार आपापल्या देशांचे नेतृत्व चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी करणार आहेत.