शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जोकोविच दुसऱ्या फेरीत

By admin | Updated: June 28, 2016 06:15 IST

ब्रिटनचा वाईल्ड कार्डप्राप्त खेळाडू जेम्स कार्ड याचा सोमवारी ६-०, ७-६, ६-४ असा पराभव करताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेची दुसरी फेरी गाठली.

लंडन : जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू आणि गत चॅम्पियन सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने चौथ्यांदा विम्बल्डन विजेतेपद पटकावण्याच्या आपल्या अभियानाला शानदार सुरुवात करताना ब्रिटनचा वाईल्ड कार्डप्राप्त खेळाडू जेम्स कार्ड याचा सोमवारी ६-०, ७-६, ६-४ असा पराभव करताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. नववा मानांकित क्रोएशियाचा मारिन सिलीच आणि १३वा मानांकित स्पेनचा डेव्हिड फेरर यांनी पुरुष गटात आणि माजी चॅम्पियन व आठवी मानांकित अमेरिकेची व्हीनस विल्यम्सनेदेखील स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. नववा मानांकित अमेरिकेचा मेडिसन कीस हादेखील विजयी ठरला.या वर्षी आॅस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावणाऱ्या जोकोविचने ब्रिटिश खेळाडूविरुद्धची लढत २ तास ३ मिनिटांत जिंकली. जोकोविचने पहिला सेट एकही गेम न गमावता ६-० असा जिंकला; परंतु दुसऱ्या सेटमध्ये मात्र त्याला संघर्ष करावा लागला. सर्बियन खेळाडूने हा सेट टायब्रेकरमध्ये ७-३ ने जिंकला. त्यानंतर त्याने तिसरा सेट ६-४ असा जिंकून दुसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चित केला. माजी नंबर वन आणि विम्बल्डनमध्ये पाच वेळेस चॅम्पियन राहिलेल्या व्हीनसने क्रोएशियाच्या १९ वर्षीय डोना वेकीच हिचा १ तास ५२ मिनिटांत ७-६, ६-४ असा पराभव केला. व्हीनसला पहिला सेट जिंकण्यासाठी घाम गाळावा लागला आणि तिने हा सेट टायब्रेकमध्ये ७-३ असा जिंकला. पहिल्या फेरीत सर्वाधिक सनसनाटी निकाल २१वी मानांकित जर्मनीची फिलिप कोलश्रेबर पराभूत झाल्याने लागला. बिगरमानांकित फ्रान्सची पियरे ह्यूज हर्बर हिने कोलश्रेबर हिच्यावर १ तास ५६ मिनिटांच्या ४ सेटमध्ये रंगलेल्या लढतीत ७-६, ७-६, ६-४ असा खळबळजनक विजय मिळविला. महिला गटात १४वी मानांकित आॅस्ट्रेलियाची सामंथा स्टोसूर हिने पोलंडची माग्दा लिनेट हिच्यावर १ तास १७ मिनिटांच्या लढतीत ७-५, ६-३ अशी मात केली.