Diya Chitale doubles gold in the National Table Tennis Championship | दिया चितळेला राष्ट्रीय टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक
दिया चितळेला राष्ट्रीय टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक

जम्मू : मुंबईच्या दिया चितळेने युटीटी 81 व्या ज्युनियर व युथ राष्ट्रीय  आणि आंतर राज्यस्तरीय टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत हिने दोन सुवर्णपदक मिळवले. जम्मू येथे रविवारी स्पर्धा पार पाडली.  मुलींच्या ज्युनियर एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात दियाने महाराष्ट्रच्या स्वस्तिका घोषवर 11-6, 11-2, 11-9, 11-5 असा विजय मिळवला. मुलींच्या युथ गटातील अंतिम सामन्यात 16 वर्षीय दियाने बंगालच्या सुरभी पटवारीवर 12-10, 8-11, 17-15, 11-6, 11-6 असा विजय नोंदवला. दुसरा सेट 8-11 असा पराभूत झाल्यानंतर दियाने प्रतिस्पर्धी खेळाडूला कोणतीच संधी न देता विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले. यापूर्वी महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात निर्णायक भूमिका पार पाडली होती.

 मुलांच्या ज्युनियर एकेरी गटात दिल्लीच्या पायस जैनने दिल्लीच्या यशांश मलिकवर 11-8, 9-11, 11-9, 11-7, 11-7 असा विजय नोंदवला. मुलांच्या युथ गटात तेलंगणाच्या फिडेल रफिक स्नेहीत दिल्लीच्या श्रेयांश गोयलला 11-4, 11-6, 11-5, 11-7 अशा फरकाने नमवित जेतेपद पटकावले. महाराष्ट्रच्या खेळाडूंनी पाच सुवर्णपदक, तीन रौप्यपदक आणि पाच कांस्यपदकाची कमाई केली.

Web Title: Diya Chitale doubles gold in the National Table Tennis Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.