शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
6
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
7
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
8
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
9
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
10
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
11
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
12
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
13
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
14
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
15
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
16
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
17
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
18
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
19
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
20
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
Daily Top 2Weekly Top 5

धोनीला स्थिरावण्यास वेळ लागत नाही : कुंबळे

By admin | Updated: October 20, 2016 06:32 IST

कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या ‘फिनिशर’च्या भूमिकेवर सातत्याने प्रश्नचिन्ह लावले जात आहे.

नवी दिल्ली : कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या ‘फिनिशर’च्या भूमिकेवर सातत्याने प्रश्नचिन्ह लावले जात आहे. त्याच वेळी त्याला वरच्या स्थानावर फलंदाजीला पाठविणे योग्य ठरेल का, अशीदेखील चर्चा होते. या पार्श्वभूमीवर कोच अनिल कुंबळे यांनी धोनीकडे पुरेसा अनुभव असल्याने त्याला क्रिझवर स्थिरावण्यास अधिक वेळ लागत नसल्याचे सांगितले.पुढील वर्षी ब्रिटनमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी धोनीला फलंदाजीत वरच्या स्थानावर खेळण्यास सांगितले जाईल का, या प्रश्नाच्या उत्तरात कुंबळे म्हणाले, की हे सर्वसामन्यांतील परिस्थितीवर अवलंबून असते. लक्ष्याचा पाठलाग करताना अधिक अनुभव लागतो. धोनीकडे असा पुरेसा अनुभव आहे. फलंदाज या नात्याने सामर्थ्यवान असल्याने त्याने इतक्या वर्षांत दाखवून दिले.धोनीला क्रिझवर स्थिरावण्यासाठी वेळ द्यायला हवा, यावर विचारमग्न होण्याची आम्हाला गरज नाही. मनीष पांडे हा घरच्या मैदानावर चौथ्या स्थानावर खेळतो. लहानशा कारकिर्दीत त्याने हे सिद्धही केले. गरज भासल्यास मनीषलादेखील वरच्या स्थानावर पाठविण्याची आमची तयारी असल्याचे कुंबळे यांनी स्पष्ट केले. के. एल. राहुल आणि शिखर धवन जखमी झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला वरच्या क्रमावर खेळण्याची संधी मिळाली, असे सांगून कुंबळे म्हणाले, की इंग्लंड संघ भारतात येईल, त्या वेळी स्थिती अधिक स्पष्ट होईल. माझ्या मते रहाणे वरच्या स्थानावर फिट बसतो. आम्ही यावर कायम राहू. शिखर आणि राहुल फिट झाल्यानंतर पर्याय राहतील. वन डे मालिकेत रहाणे डावाचा प्रारंभ करेल. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी मात्र कोण सुरुवात करेल, याचा निर्णय नंतर घेतला जाईल.(वृत्तसंस्था)>हार्दिकमुळे संघात संतुलन निर्माण होईल. तो चांगला वेगवान मारा करतो. नव्या चेंडूने त्याने अप्रतिम मारा केला. फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू संघासाठी उपयुक्त आहे, असे मी म्हणालो होतो. पंड्या असाच खेळाडू असल्याने त्याच्या प्रगतीकडे आमचे लक्ष आहे. हार्दिकने सात-आठ षटके चांगली टाकल्यास संघात संतुलन निर्माण होण्यास मदत मिळणार, अशी मला खात्री आहे. - अनिल कुंबळे