शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्रो सिंगची उपांत्यपूर्व फेरीत धडक

By admin | Updated: June 21, 2016 02:08 IST

राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता एल. देवेंद्रो सिंग (४९ किलो) याने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघातर्फे आयोजित विश्व आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली,

बाकू : राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता एल. देवेंद्रो सिंग (४९ किलो) याने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघातर्फे आयोजित विश्व आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली, तर अनुभवी मनोज कुमारने (६४ किलो) अंतिम १६ खेळाडूंत स्थान मिळवले आहे. चौथ्या मानांकित देवेंद्रोला सुरुवातीच्या फेरीत बाय मिळाला होता. त्याने एकतर्फी ठरलेल्या लढतीत अर्जेंटिनाच्या लियांड्रो ब्लांकचा ३-० ने पराभव केला, तर राष्ट्रकुल स्पर्धेतील माजी सुवर्णपदक विजेत्या मनोजने वर्चस्व गाजवताना दुसऱ्या मानांकित मोहंमद इस्लाम अहमद अली याच्यावर ३-० ने मात केली. आशियाई रौप्यपदक विजेत्या देवेंद्रोला मंगळवारी दक्षिण आफ्रिकेच्या सिबुसिसो बांडच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. त्याने उपउपांत्यपूर्व फेरीत कोरियाच्या ली येचानचा पराभव केला. २३ वर्षीय देवेंद्रोला आॅलिम्पिक पात्रता मिळवण्यासाठी अंतिम फेरी गाठावी लागेल. मनोजला यानंतर बुल्गारियाच्या आयरिन स्मेतोव्हच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. मनोज उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला तर तो आॅलिम्पिकासाठी पात्र ठरेल. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर ३९ बॉक्सर्सना पात्रता मिळवण्याची संधी आहे. त्यात ४९ किलो गटात दोन, ५२, ५६, ६०, ६९ आणि ८१ किलो वजन गटात प्रत्येकी पाच तर ९१ किलो व ९१ किलोपेक्षा अधिक गटात प्रत्येकी एक स्थान राहील. १००पेक्षा अधिक देशांतील ४०० बॉक्सर्स या अखेरच्या पात्रता स्पर्धेत कोटा स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हौशी बॉक्सर्ससाठी ही अखेरची पात्रता स्पर्धा आहे. भारताने ५६ किलो वजन गटात एकाही बॉक्सर्सला पाठविले नाही. कारण शिव थापाने यापूर्वीच मार्चमध्ये आशियाई पात्रता स्पर्धेदरम्यान रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे. (वृत्तसंस्था)