शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
4
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
5
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
6
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
7
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
8
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
10
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
11
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
12
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
14
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
15
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
16
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
17
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
18
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
19
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
20
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार

लंकेचा यूएईविरुद्ध विजयाचा निर्धार

By admin | Published: February 25, 2016 3:51 AM

स्टार खेळाडूंच्या पुनरागमनामुळे मनोधैर्य उंचावलेल्या श्रीलंका संघाला आशिया कप टी-२० स्पर्धेत पहिल्या रॉऊंड रॉबिन लीग सामन्यात गुरुवारी संयुक्त अरब अमिरातीच्या

मिरपूर : स्टार खेळाडूंच्या पुनरागमनामुळे मनोधैर्य उंचावलेल्या श्रीलंका संघाला आशिया कप टी-२० स्पर्धेत पहिल्या रॉऊंड रॉबिन लीग सामन्यात गुरुवारी संयुक्त अरब अमिरातीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. श्रीलंका संघात कर्णधार लसिथ मलिंगा आणि कसोटी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज यांचे पुनरागमन झाले आहे. दुखापतग्रस्त असल्यामुळे या दोन्ही खेळाडूंना भारताविरुद्धच्या मालिकेत सहभागी होता आले नव्हते. मलिंगा व अष्टपैलू मॅथ्यूज यांच्या पुनरागमनामुळे श्रीलंकेची गोलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. यूएईने स्पर्धेपूर्वी ४ संघांच्या पात्रता स्पर्धेत जेतेपद पटकावून मुख्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. डावखुरा फिरकीपटू रंगना हेराथने श्रीलंका संघात पुनरागमन केले आहे. शेर-ए-बांगला स्टेडियममधील फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर हेराथकडून चमकदार कामगिरीची आशा आहे. फलंदाजीमध्ये तिलकरत्ने दिलशान, मॅथ्यूज, दिनेश चांदीमल, चामरा कापुगेदरा आणि थिसारा परेरा यांच्यावर भिस्त राहील. गोलंदाजीमध्ये मलिंगाच्या साथीला नुवान कुलशेखरा व दुष्मंता चामिरा राहतील. फिरकीची जबाबदारी सचित्रा सेनानायके आणि हेराथ हे सांभाळतील. यूएई संघाला या स्पर्धेच्या निमित्ताने आशियातील दिग्गज संघांमध्ये स्थान मिळविण्याची संधी मिळाली आहे. पात्रता स्पर्धेत यूएईने अफगाणिस्तान, हाँगकाँग आणि ओमान या संघांचा पराभव केला होता. वेगवान गोलंदाज नवीदने ७ बळी घेतले होते, तर आघाडीच्या फळीतील फलंदाज मोहंमद शहजादने १११ धावा फटकावल्या होत्या. (वृत्तसंस्था)प्रतिस्पर्धी संघश्रीलंका : लसिथ मलिंगा (कर्णधार), अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चांदीमल, तिलकरत्ने दिलशान, निरोशान डिकवेल्ला, शेहन जयसूर्या, मिलिंदा सिरीवर्धना, दासून शनाका, चामरा कापुगेदरा, नुवान कुलशेखरा, दुष्मंता चामिरा, थिसारा परेरा, सचित्रा सेनानायके, रंगना हेराथ, जेफ्री वाँडरसे.यूएई : अमजद जावेद (कर्णधार), अहमज राजा, फहाद तारिक, फरहान अहमद, मोहंमद नावेद, मोहंमद शहजाद, मोहंमद कलीम, मोहंमद उस्मान, स्वप्निल पाटील, कादीर अहमद, रोहन मुस्तफा, सकलिन हैदर, शैमान अन्वर, उस्मान मुश्ताक, झहीर मकसूद.