शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

तारीख पे तारीख... आता १७ आॅक्टोबरला सुनावणी

By admin | Updated: October 8, 2016 03:37 IST

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) २४ तासांचा अल्टिमेटम मिळाल्यानंतर गुरुवारी सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार

नवी दिल्ली : लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) २४ तासांचा अल्टिमेटम मिळाल्यानंतर गुरुवारी सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी १७ आॅक्टोबरपर्यंत स्थगित केली आहे. यामुळे पुन्हा एकदा बीसीसीआयला न्यायालयाच्या आदेशाचे प्रतीक्षा करावी लागेल. त्याचबरोबर, न्यायालयाने बीसीसीआयला राज्य संघटनांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक साह्य करण्यास मनाई केली आहे.सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील ३ सदस्यीय खंडपीठाने गुरुवारी बीसीसीआयला लोढा शिफारशी मान्य करण्याचा २४ तासांचा अल्टिमेटम दिला होता. शिवाय, असे न केल्यास दुसऱ्या दिवशी आम्ही आमचा आदेश देऊन बोर्डाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या जागी प्रशासकांच्या समितीची नियुक्ती करू, असेही न्यायालयाने बजावले होते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल १७ आॅक्टोबरला देण्याचे निश्चित केले आहे.त्याच वेळी न्यायालयाने बीसीसीआयला संलग्न राज्य संघटनांना आर्थिक साह्य करण्यापासूनही रोखले आहे. न्यायालयाने सांगितले, ‘‘जोपर्यंत बीसीसीआय लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याचे जाहीर करीत नाही, तोपर्यंत राज्य संघटनांना त्यांनी कोणतेही आर्थिक साह्य करू नये.’’ त्याचबरोबर, लोढा समितीच्या शिफारशींसंबंधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) सीईओ डेव्हिड रिचडर््सन यांच्याशी बातचित करण्यासाठी वैयक्तिक वचनपत्र सादर करण्याचेही सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना सांगितले आहे. (वृत्तसंस्था)