शहरं
Join us  
Trending Stories
1
ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
2
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
3
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
4
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
5
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
6
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
7
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
8
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
9
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
10
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
11
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
12
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
13
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
14
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
15
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
16
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
17
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
18
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
19
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
20
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
Daily Top 2Weekly Top 5

दीप्तयान घोषचे अग्रस्थान कायम

By admin | Updated: June 8, 2016 03:00 IST

दीप्तयान घोष याने नवव्या मुंबई महापौर खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखताना इंटरनॅशनल मास्टर श्याम निखिलला धक्का देत अव्वल स्थान काबीज केले


मुंबई : ग्रँडमास्टर दीप्तयान घोष याने नवव्या मुंबई महापौर खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखताना इंटरनॅशनल मास्टर श्याम निखिलला धक्का देत अव्वल स्थान काबीज केले. त्याचवेळी तीन खेळाडूंनी संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी झेप घेतली.
स्पर्धेत दीप्तयानने ६.५ गुणांसह अग्रस्थान मिळवले आहे. तर रशियाचा ग्रँडमास्टर ग्रचेव बोरिस, भारताचा हिमल गुसैन व ताजिकिस्तानचा अमानतोव्ह फारुख यांनी प्रत्येकी ६ गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे.
विशेष म्हणजे याआधी संयुक्तपणे अव्वल स्थानी आलेल्या दीप्तयान आणि पी. श्याम निखिल यांच्यात अटीतटीची लढत झाली. २९व्या चालीमध्ये श्यामने हत्तीच्या जोरावर दीप्तयानच्या राजाला शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र वजिराच्या साहाय्याने दीप्तयानने श्यामची चाल परतावून लावली. यानंतर दीप्तयानने आक्रमक चाली रचताना ६०व्या चालीमध्ये बाजी मारली. तसेच, रशियाच्या बोरिसने इंटरनॅशनल मास्टर अभिषेक केळकरचा, हिमलने सम्माद शेट्ये व अमानतोव्हने शैलेश द्रविडचा पाडाव करून संयुक्तपणे दुसरे स्थान मिळवले. (क्रीडा प्रतिनिधी)