बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 10:30 IST2025-10-21T10:29:43+5:302025-10-21T10:30:30+5:30

Daniel Naroditsky Death: डॅनियल नरोडित्स्की हा अमेरिकेच्या बुद्धिबळ क्षेत्रातील सर्वात हुशार आणि आश्वासक प्रतिभांपैकी एक होता. त्याने वयाच्या १८ व्या वर्षी ग्रँडमास्टरचा किताब पटकावला होता.

Daniel Naroditsky Death: Big shock to the chess world! American 'Grandmaster' Daniel Naroditsky passes away suddenly at the age of 29 | बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन

बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ जगतातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. अमेरिकेचा प्रख्यात बुद्धिबळपटू आणि ग्रँडमास्टर डॅनियल नरोडित्स्की याचे वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी अचानक निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे.

चार्लोट बुद्धिबळ केंद्राने सोमवारी एक निवेदन जारी करून नरोडित्स्की यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही, तसेच त्यांच्या कुटुंबियांनीही याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

डॅनियल नरोडित्स्की कोण होता?
डॅनियल नरोडित्स्की हा अमेरिकेच्या बुद्धिबळ क्षेत्रातील सर्वात हुशार आणि आश्वासक प्रतिभांपैकी एक होता. त्याने वयाच्या १८ व्या वर्षी ग्रँडमास्टरचा किताब पटकावला होता. डॅनियल हा केवळ खेळाडूच नव्हता तर एक उत्कृष्ट बुद्धिबळ समालोचक आणि लेखकही होता. वयाच्या १४ व्या वर्षीच 'मास्टरिंग पोझिशनल चेस'नावाचे पहिले पुस्तक प्रकाशित केले होते. त्याचे वडील व्लादिमीर युक्रेनचे, तर आई लीना अझरबैजानची होती. नुकतीच यूएस नॅशनल ब्लिट्झ चॅम्पियनशिप जिंकली होती. 

विश्वनाथन आनंद यांच्याकडून शोक व्यक्त 

नरोडित्स्की यांच्या आकस्मिक निधनानंतर भारताचे महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. "ग्रँडमास्टर डॅनियल नरोडित्स्की यांच्या निधनाची बातमी ऐकून मी खरोखरच स्तब्ध झालो आहे. ते एक उत्कृष्ट बुद्धिबळ समालोचक आणि शिक्षक होते. एक खरे आणि सज्जन माणूस. त्यांचे आयुष्य खूप लवकर संपले. त्यांच्या कुटुंबियांप्रति माझ्या तीव्र संवेदना. बुद्धिबळ जगताला त्यांची उणीव भासेल."

Web Title : शतरंज जगत में शोक: ग्रैंडमास्टर डेनियल नरोडित्स्की का 29 वर्ष की आयु में निधन

Web Summary : अमेरिकी ग्रैंडमास्टर डेनियल नरोडित्स्की का 29 वर्ष की आयु में निधन हो गया, जिससे शतरंज जगत में शोक की लहर है। अपनी प्रतिभा, कमेंट्री और लेखन के लिए जाने जाने वाले, उन्होंने 18 साल की उम्र में ग्रैंडमास्टर का दर्जा हासिल किया। विश्वनाथन आनंद ने इस प्रतिभाशाली शतरंज खिलाड़ी के निधन पर दुख व्यक्त किया।

Web Title : Chess world mourns: Grandmaster Daniel Naroditsky dies at 29

Web Summary : American Grandmaster Daniel Naroditsky passed away at 29, shocking the chess world. Known for his talent, commentary, and writing, he achieved Grandmaster status at 18. Viswanathan Anand expressed grief over the loss of the chess prodigy.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.