रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 22:58 IST2025-08-23T22:55:51+5:302025-08-23T22:58:24+5:30

रोनाल्डोनं मोठा डाव साधला, पण...

Cristiano Ronaldo Becomes First Player In History To Score 100 Goals For 4 Different Clubs And Nation See Record | रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू

रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू

फुटबॉल जगतातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोनं नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. पोर्तुगालच्या स्टार खेळाडूनं सौदी सुपर कपच्या फायनलमध्ये अल नासरच्या संघाकडून १०० वा गोल डागला. या कामगिरीसह वेगवेगळ्या ४ संघाकडून १०० पेक्षा अधिक गोल करण्याचा महा रेकॉर्ड आता रोनाल्डोच्या नावे झाला आहे. फुटबॉलच्या आतापर्यंतच्या इतिहासात अन्य कोणत्याही खेळाडूनं अशी कामगिरी केलेली नाही. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

रोनाल्डोनं मोठा डाव साधला, पण त्याचा संघ हरला

सौदी सुपर लीगच्या फायनलमध्ये अल नासर विरुद्ध अल अहली यांच्यात सामना रंगला होता. जेतेपदाच्या लढतीत रोनाल्डोनं या क्लबकडून १०० गोल करण्याचा डाव साधला. पण या सामन्यात रोनाल्डोच्या संघावर पराभवाची नामुष्की ओढावली. निर्धारित वेळेत  सामना २-२ असा बरोबरीत राहिला. पेनल्टी शूटआउटमध्ये अल अहली क्लबां रोनाल्डोच्या अल नासर संघाचा ५-३ अशी मात दिली.

ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?

कोणत्या क्लबकडून खेळताना किती गोल डागले?

अल नासर क्लबकडून १०० गोल नोंदवण्या आधी रोनाल्डोनं अल माद्रिदकडून खेळताना ४५० गोल केल्याचा रेकॉर्ड आहे. एका क्लबकडून रोनाल्डोची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. याशिवाय मँचेस्टर युनायटेडकडून त्याने १४५ तर युव्हेंटस क्लबकडून खेळताना १०१ गोल डागले आहेत. पोर्तुगालकडून खेळतानाही त्याच्या खात्यात १३८ गोलची नोंद आहे. हा  आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोलचा विक्रम आहे.
 

Web Title: Cristiano Ronaldo Becomes First Player In History To Score 100 Goals For 4 Different Clubs And Nation See Record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.