शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेट विंडीज

By admin | Updated: February 16, 2015 21:11 IST

आयर्लंडचा विंडीजला धक्का

आयर्लंडचा विंडीजला धक्का
पॉल स्टर्लिंग, एड जॉयस, नील ओब्रायनची अर्धशतके
नेल्सन : पॉल स्टर्लिंग (९२), एड जॉयस (८४) व नील ओब्रायन (७९) यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळीच्या जोरावर जायंट किलर आयर्लंडने सोमवारी खेळल्या गेलेल्या लढतीत वेस्ट इंडीजचा ४ गडी राखून पराभव केला आणि आयसीसी विश्वकप स्पर्धेत धक्कादायक निकालाची नोंद केली.
गेल्या दोन विश्वकप स्पर्धेत पाकिस्तान व इंग्लंड यांच्यासारख्या अव्वल संघांना पराभवाचा तडाखा देणाऱ्या आयर्लंडने यावेळीही धक्कादायक निकाल नोंदविण्याची परंपरा कायम राखली. वेस्ट इंडीजने दिलेले ३०५ धावांचे लक्ष्य आयर्लंडने ४५.५ षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. विंडीजतर्फे वेगवान गोलंदाज जेरोम टेलरने ७१ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले.
त्याआधी, वेस्ट इंडीजने निराशाजनक सुरुवातीनंतर लेंडल सिमन्स (१०२) व डॅरेन सॅमी (८९) यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर ७ बाद ३०४ धावांची मजल मारली. सिमन्स व सॅमी यांनी सहाव्या विकेटसाठी १५४ धावांची भागीदारी केली. विश्वकप स्पर्धेत सहाव्या विकेटसाठी ही तिसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. विंडीजचे क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचे होते. त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी किमान चार झेल सोडले. अर्धशतकी खेळी करणाऱ्या जॉयसला वैयक्तिक ४२ धावांवर असताना जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर डॅरेन ब्राव्होने जीवदान दिले तर नील ओब्रायनला २८ व ३८ धावांवर जीवदान मिळाले. सलामीवीर विलियम पोर्टरफिल्डचा (२३) स्वत:च्या चेंडूवर उडालेला झेल आंद्रे रसेलला टिपण्यात अपयश आले.
आयर्लंडला अखेरच्या १० षटकांत विजयासाठी २२ धावांची गरज होती. त्यानंतर ॲण्डी बिलबिर्नी (०९), गॅरी विल्सन (०१) आणि केव्हिन ओब्रायन (००) एकापाठोपाठ बाद झाले. नील ओब्रायनने संघाला विजयी लक्ष्य गाठून दिले. नील ओब्रायनने ६० चेंडूंच्या खेळीमध्ये ११ चौकार ठोकले.
त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या वेस्ट इंडीजची एकवेळ ५ बाद ८७ अशी अवस्था झाली होती, पण त्यानंतर सिमन्स व सॅमी यांनी डाव सावरला. ड्वेन स्मिथ (१८), ब्राव्हो (०), ख्रिस गेल (३६ धावा, ६५ चेंडू, ३ चौकार, १ षटकार) यांना मोठी खेळी करता आली नाही. दिनेश रामदिन (१) यालाही छाप सोडता आली नाही.