Corona Virus : 'त्या' एका निर्णयामुळे भारतीय खेळाडूवरील संकट टळलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 10:11 AM2020-04-08T10:11:46+5:302020-04-08T10:12:26+5:30

अमेरिकेत कोरोना व्हायरनं थैमान माजवले आहे.

Corona Virus : Indian Golfer Aditi Ashok Narrowly Missed Getting Stuck in the US svg | Corona Virus : 'त्या' एका निर्णयामुळे भारतीय खेळाडूवरील संकट टळलं!

Corona Virus : 'त्या' एका निर्णयामुळे भारतीय खेळाडूवरील संकट टळलं!

Next

नशीब कधी कोणाची कशी साथ देईल, हे सांगणे अवघडच आहे. कधी कधी मोक्याच्या क्षणी घेतलेले निर्णयही फायद्याचे ठरतात. भारतीय महिला गोल्फपटू अदिती अशोक हिच्या अशाच एका निर्णयानं तिच्यावरील मोठ संकट टाळले. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अमेरिकेत कोरोना व्हायरनं थैमान माजवले आहे. अशा परिस्थितीत अदितीवर अमेरिकेत अडकण्याचे संकट ओढावणार होते, परंतु सुदैवानं एका निर्णयानं ते संकट टळलं.

अमेरिकेत होणाऱ्या  LPGA Tour स्पर्धेत सहभाग घेणारी अदिती एकमेव भारतीय गोल्फपटू होती. 13 मार्चला ती या स्पर्धेसाठी अमेरिकेला रवाना होणार होती, परंतु त्याच दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपातून येणाऱ्या सर्व विमानसेवांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. ही बंदी शुक्रवार ( 13 मार्च) पासून लागू होणार असल्यानं अदितीनं एक दिवस आधी रवाना होण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी  तिनं लंडन व्हाया अमेरिका असा प्रवास करण्याचे ठरवले. पण, तिचे हे प्रयत्न व्यर्थ ठरले.

''शुक्रवारी मध्यरात्रीपासून ही बंदी लागू होणार होती, त्यामुळे मी एकदिवस आधी रवाना होण्याचं ठरविले. पण, तिच्या या प्रयत्नांना यश आले नाही. तिनं लंडन व्हाया अमेरिका असे तिकीट बूक केले. पण, ही स्पर्धा रद्द झाल्याची माहिती समोर आली,'' असे अदितीनं सांगितले. 

अमेरिकेत न जाण्याचा निर्णय योग्य ठरला असे 22 वर्षीय अदितीनं सांगितले. ती म्हणाली,''गुरुवारीच मी रवाना झाली असती तर अमेरिकेत अडकून पडण्याचे संकट माझ्यावर ओढावले असते आणि कधी परत आले असते, याची कल्पनाही मला नव्हती. या स्पर्धेचे सुरुवातीचा आठवडा रद्द करण्यात आल्याचं आम्हाला माहीत होतं, परंतु पुढीत तीनही स्पर्धा रद्द झाल्याची घोषणा झाली. स्पर्धा रद्द झाल्याचं दुःख झालं. पण, त्याचवेळी सात आठवडे अमेरिकेत राहणे महागात पडले असते. दिवसभर काहीच न करता घरीच बसून राहणं, हे कधी घडलं नव्हतं. यानं मानसिक कणखरतेची कसोटी लागत आहे. ''
 

Web Title: Corona Virus : Indian Golfer Aditi Ashok Narrowly Missed Getting Stuck in the US svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.