Commonwealth Games 2022 : ४० वर्षीय शरथ कमलचे १२ वे पदक, श्रीजा अकुलासह जिंकले मिश्र दुहेरीचे सुवर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 01:00 AM2022-08-08T01:00:20+5:302022-08-08T01:03:38+5:30

Commonwealth Games 2022 Table Tennis : भारताच्या ४० वर्षीय टेबल टेनिसपटू अचंथा शरथ कमलने स्वतःच्या नावावर आणखी एक राष्ट्रकुल पदक जमा केले

Commonwealth Games 2022 Table Tennis : Mixed doubles duo of Sharath Kamal and Sreeja Akula win gold, They beat Malaysian pair of Choong Javen and Lyne Karen | Commonwealth Games 2022 : ४० वर्षीय शरथ कमलचे १२ वे पदक, श्रीजा अकुलासह जिंकले मिश्र दुहेरीचे सुवर्ण

Commonwealth Games 2022 : ४० वर्षीय शरथ कमलचे १२ वे पदक, श्रीजा अकुलासह जिंकले मिश्र दुहेरीचे सुवर्ण

Next

Commonwealth Games 2022 Table Tennis : भारताच्या ४० वर्षीय टेबल टेनिसपटू अचंथा शरथ कमलने स्वतःच्या नावावर आणखी एक राष्ट्रकुल पदक जमा केले. यावेळेस त्याने श्रीजा अकुलासह मिश्र दुहेरीचे सुवर्णपदक जिंकले. शरथ कमल व अकुला या जोडीने मलेशियन जोडी चूंग जावेन व लिन कारेन यांचा ११-४, ९-११, ११-५, ११-६ असा पराभव करून भारतासाठी १८वे सुवर्णपदक जिंकले. पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात अचंथा शरथ कमल व साथियन ज्ञानसेकरन ( ACHANTA Sharath Kamal / GNANASEKARAN Sathiyan) या जोडीने रौप्यपदक जिंकले. 

शरथ कमलने आतापर्यंत सहभाग घेतलेल्या प्रत्येक राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाची कमाई केली आहे. टेबल टेनिस संघातील सर्वात अनुभवी खेळाडू असलेल्या शरथ कमलने आतापर्यंत ५ सुवर्ण, दोन रौप्य व ३ कांस्य अशी एकूण १० पदकांची कमाई केली आहे. २००६मध्ये त्याने पुरुष एकेरीत व पुरुष सांघिक गटाचे सुवर्ण जिंकले होते. २०१०मध्ये पुरुष दुहेरीत सुवर्ण, २०१८ व २०२२ मध्ये पुरूष सांघिक गटाचे सुवर्ण त्याच्या नावावर आहे. २०१४ व २०१८मध्ये पुरुष दुहेरीत त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. २०१०मध्ये पुरुष सांघिक, २०१८मध्ये पुरुष एकेरी व २०१८ मिश्र दुहेरीत कांस्य जिंकले आहे. 

#TableTennis भारताच्या युवा टेबल टेनिसपटू श्रीजा अकुलाला चिवट खेळीनंतर कांस्यपदकाच्या लढतीत हार मानावी लागली. श्रीजाला महिला एकेरीच्या कांस्यपदकाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या यांगजी लियूकडून ११-३, ६-११, २-११, ११-७, १३-१५, ११-९, ७-११ असा पराभव पत्करावा लागला.

#TableTennis ४० वर्षीय अचंथा शरथ पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहॉलवर ११-८, ११-८, ८-११, ११-७,  ९-११, ११-८ असा विजय मिळवला. २००६नंतर कमलने पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. २००६ मध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले होते. 

Web Title: Commonwealth Games 2022 Table Tennis : Mixed doubles duo of Sharath Kamal and Sreeja Akula win gold, They beat Malaysian pair of Choong Javen and Lyne Karen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.