शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

Commonwealth Games 2018: राहुल आवारे अंतिम फेरीत; पाकिस्तानच्या मोहम्मद बिलालला धोबीपछाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 08:39 IST

भारताचं आणखी एक पदक निश्चित

गोल्ड कोस्ट: राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीपटू राहुल आवारेनं अंतिम फेरीत धडक मारत भारताचं आणखी एक पदक निश्चित केलं आहे. राहुलनं ५७ किलो वजनी गटात पाकिस्तानच्या मोहम्मद बिलालचा १२-८ नं पराभव करत उपांत्य फेरीचा सामना जिंकला आहे. आता अंतिम फेरीत राहुलला कॅनडाच्या स्टिफन ताकाहशीचा सामना करावा लागेल. 

उपांत्यपूर्व फेरीत तांत्रिक सक्षमतेच्या जोरावर ११-० असा विजय मिळवणाऱ्या राहुल आवारेनं उपांत्य फेरीत सुरुवातीला सावध खेळ केला. राहुलनं बचावात्मक खेळ करत मोहम्मद बिलालला गुण मिळू दिला नाही. यानंतर राहुलनं तांत्रिक गुणांची कमाई करत आघाडी घेतली. मात्र राहुलची आघाडी मोहम्मदनं कमी केली. पहिल्या फेरीनंतर राहुलकडे ३-२ अशी आघाडी होती. दुसऱ्या फेरीला सुरुवात होताच राहुलनं पुन्हा एकदा बचावात्मक पवित्रा घेतला. या फेरीतही राहुलनं तांत्रिक गुण मिळवत आघाडी कायम ठेवली. मात्र मोहम्मदनं पुनरागमन करत सामना ४-४ असा बरोबरीत आणला. राहुल आणि मोहम्मदमध्ये अटीतटीची झुंज सुरु होती. यानंतर मोहम्मदनं आघाडी घेण्याच्या प्रयत्नात राहुलला खाली पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र राहुलनं मोहम्मदचा डाव त्याच्यावरच उलटवला. राहुलनं प्रथम प्रतिस्पर्ध्याचा प्रयत्न निष्फळ केला. त्यानंतर त्यानं दोनदा मोहम्मदला लोळवलं आणि सहा गुणांची कमाई केली. यामुळे राहुलला १०-४ अशी भक्कम आघाडी मिळाली. यानंतर मोहम्मदनं २ गुण मिळवत पिछाडी भरुन काढण्याचा प्रयत्न केला. मोठी आघाडी घेतल्यानंतर राहुलनं सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवलं. सामना संपण्यास काही सेकंद बाकी असताना राहुलनं आणखी दोन गुणांची कमाई करत आघाडी १२-६ अशी केली. यानंतर मोहम्मदनं २ गुण मिळवले. मात्र तोपर्यंत सामना त्याच्या हातून निसटला होता. राहुलनं मोहम्मद बिलालचा १२-८ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केल्यानं भारताचं आणखी एक पद निश्चित झालं आहे.  

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८IndiaभारतPakistanपाकिस्तान