शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

चिली पेनल्टी शूटआऊटमध्ये चॅम्पियन, मेस्सीचे स्वप्न भंगले

By admin | Updated: July 6, 2015 01:35 IST

चिलीने अर्जेंटिनाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करताना कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा जिंकण्याची आपली ९९ वर्षांची प्रतीक्षा संपवली.

सँटियागो : चिलीने अर्जेंटिनाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करताना कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा जिंकण्याची आपली ९९ वर्षांची प्रतीक्षा संपवली. त्यामुळे लिओनेल मेस्सीला सलग दुसऱ्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या फायनलमध्ये निराशेचा सामना करावा लागला.आर्सेनलचा स्टार अलेक्सिस सांचेजने चिलीकडून विजयी गोल केला. दोन्ही संघ निर्धारित वेळेत गोल करण्यात अपयशी ठरले. त्यानंतर झालेल्या शूटआऊटमध्ये यजमान चिलीने ४-१ अशी बाजी मारली.सांचेजने सर्जियो रोमेरो याला चकवताना पेनल्टीवर निर्णायक गोल करताच एस्टेडियातील उपस्थित ४५ हजार प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.चिलीने शूटआऊटमध्ये आपले पूर्ण नियंत्रण ठेवले. अर्जेंटिनाचा गोंजालो हिगुएनचा फटका क्रॉस बारच्या बाहेर निघून गेला, तर चिलीचा गोलरक्षक क्वाडियो ब्राव्होने बेनेगाचा शॉट रोखला होता. अशा प्रकारे अर्जेंटिनाचा कर्णधार मेस्सीचा २२ वर्षांत आपल्या संघाला पहिले आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. दुसरीकडे चिलीने कोपा अमेरिका स्पर्धेत अर्जेंटिनावर पहिलाच विजय नोंदवला.चिलीचा स्टार अर्तुरो विडाल म्हणाला, ‘‘हे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे. आम्ही यासाठी कठोर मेहनत घेतली होती.’’ गेल्या वर्षी वर्ल्डकपमध्ये पेनल्टी शूटआऊटमध्ये बाहेर झाल्यानंतर आमचा संघ कोपा अमेरिका जिंकण्यासाठी कटिबद्ध होता, असे सांचेजने सांगितले. (वृत्तसंस्था)