शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘चेन्नई एक्स्प्रेस’ रोखली!

By admin | Updated: May 13, 2015 00:18 IST

टॉप वनच्या दिशेने भरधाव धावणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई ‘एक्स्प्रेस’ ला दिल्लीने अवघ्या ६ बाद ११९ धावांवर रोखले.

रायपूर : टॉप वनच्या दिशेने भरधाव धावणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई ‘एक्स्प्रेस’ ला दिल्लीने अवघ्या ६ बाद ११९ धावांवर रोखले. टिच्चून गोलंदाजी आणि तितकेच शानदार क्षेत्ररक्षण हे दिल्लीचे वैशिष्ट्य ठरले. झहीर खान आणि अ‍ॅल्बी मोर्केल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. चेन्नईकडून ड्यु प्लेसिसने सर्वाधिक २९ धावांची खेळी केली. शहिद वीर नारायणसिंग मैदानावरील आयपीएलच्या या ४९ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धोनीच्या या निर्णयास दिल्लीच्या गोलंदाजांनी आव्हान दिले. इतर वेळी आक्रमक सुरुवात करणारी ड्वेन स्मिथ आणि ब्रँडन मॅक्यूलम ही जोडी आज चाचपडताना दिसली. सहाव्या षटकापर्यंत त्यांनी केवळ १६ धावाच काढल्या होत्या. झहीर खानने मॅक्क्यूलम जेपी ड्युमिनीकरवी झेलबाद करीत पहिला धक्का दिला. त्यानंतर नवव्या षटकांत मोर्कलने स्मिथला पायचित केले. सुरेश रैनाला सुद्धा आज विशेष योेगदान देता आले नाही. तो ११ धावा काढून तंबूत परतला. यामध्ये त्याच्या एका चौकाराचा समावेश आहे. यादवच्या चेंडूवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात तो ड्युमिनीकरवी झेलबाद झाला. त्यानंतर ड्यु प्लेसिस आणि महेंद्रसिंग धोनी यांनी चेन्नईला सावरले. तसेच धावगती वाढवण्याचाही प्रयत्न केला. मात्र दिल्लीची भेदक गोलंदाजी त्यांना अडचणीची ठरली. ड्यु प्लेसिसने २३ चेंडूंत सर्वाधिक २९ धावा केल्या. यामध्ये त्याच्या ३ चौकारांचा समावेश आहे. धोनी-प्लेसिसने चौथ्या गड्यासाठी ३७ धावांची भागीदारी केली. चेन्नई ११ व्या षटकांत अर्धशतक पूर्ण केले. प्लेसिस चांगला खेळत होता मात्र दिल्लीचा हा मोठा अडथळा मोर्केलने त्रिफळा उडवत दूर केला. त्यानंतर धोनी आणि ड्वेन ब्राव्हो यांनी संघाचे शतक पूर्ण केले. एक षटकार आणि ३ चौकार ठोकणारा महेंद्र सिंग धोनी झहीर खानच्या चेंडूवर मोक्याच्या क्षणी बाद झाला. त्याने २७ धावा केल्या. ब्राव्हो (८), पवन नेगी (नाबाद ५), रवींद्र जडेजा (नाबाद ३) यांनी संघाला ११९ धावसंख्येपर्यंत आणले. दुसरीकडून, दिल्लीच्या गोलंदाजांना उत्कृष्ट भूमिका बजावली. झहिर खानने ४ षटकांत अवघ्या ९ धावा देत २ बळी घेतले. त्याला मोर्केलने २ बळी घेत उत्कृष्ट साथ दिली. गुरिंदर संधू आणि जयंत यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. (वृत्तसंस्था)