शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
4
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
5
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
6
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
7
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
8
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
9
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
10
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
11
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
12
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
14
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
15
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मल्लांची आॅलिम्पिक कोटासाठी धडपड

By admin | Updated: May 6, 2016 05:06 IST

येथे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या जागतिक पात्रता स्पर्धेद्वारे भारताचे मुख्य मल्ल आॅलिम्पिक कोटा मिळवण्याच्या प्रयत्नात असतील. आॅलिम्पिक कोटा मिळवण्याची ही अखेरची संधी असल्याने

इस्तंबूल : येथे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या जागतिक पात्रता स्पर्धेद्वारे भारताचे मुख्य मल्ल आॅलिम्पिक कोटा मिळवण्याच्या प्रयत्नात असतील. आॅलिम्पिक कोटा मिळवण्याची ही अखेरची संधी असल्याने जास्तीत जास्त खेळाडूंचा आपला आॅलिम्पिक प्रवेश निश्चित करण्याचा प्रयत्न असल्याने या वेळी मोठी चुरस दिसून येईल. विशेष म्हणजे १४ सदस्यीय भारताच्या चमूमध्ये गीता आणि बबिता फोगट या अव्वल महिला मल्लांची उणीव प्रकर्षाने जाणवेल. ६ ते ८ मेपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत सर्वच भारतीय मल्लांचा आॅलिम्पिक कोटा मिळवण्याचा प्रयत्न असेल. विशेष म्हणजे प्रत्येक वजनी गटातून केवल आघाडीच्या दोन मल्लांना आॅलिम्पिक तिकीट मिळणार असल्याने स्पर्धेतील सर्वच मल्लांसमोर कठीण आव्हान असेल. दखल घेण्याची बाब म्हणजे गत आठवड्यात बेशिस्तपणाच्या कारणावरून भारतीय कुस्ती महासंघाने गीता (५८ किलो), बबिता (५३), सुमित (१२५ फ्री स्टाइल) आणि राहुल आवरे (७५ फ्री स्टाइल) या मल्लांना तात्पुरते निलंबित केले. यामुळे या मल्लांचे आॅलिम्पिक स्वप्न धुळीस मिळाले आहे. त्यातच आतापर्यंत एकाही भारतीय महिला मल्लाने आॅलिम्पिक कोटा मिळवला नसल्याने सर्वांचे लक्ष या वेळी विनेश फोगाटवर असेल. (वृत्तसंस्था)महिलांच्या गटात या स्पर्धेत बबिताच्या जागी ललिता आणि गीताच्या जागी साक्षी मलिक खेळणार आहेत. त्याचबरोबर शिल्पी शेरोन (६३), गीतिका जाखड (६९) आणि किरण (७५) यांच्या कामगिरीवरही भारताची मदार असेल. दुसरीकडे पुरुषांच्या गटात मौसम खत्री (९७) भारताचे नेतृत्व करेल. तसेच गोपाल यादव (८६) आणि हितेंदर (१२५) हे भारताकडून आॅलिम्पिक कोटा मिळवण्याचा प्रयत्न करतील.