शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

कॅरम : संदिप, फ्रान्सिस, प्रफुल्ल, मैत्रेयी यांचे धडाकेबाज विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 5:46 PM

राष्ट्रीय उपविजेता संदिप दिवेने एकतर्फी झालेल्या सामन्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भारत कोळीवर २५-४, २५-३ असा विजय मिळविताना दोन ब्रेक टू फिनिशची नोंद करून हॉलमधील सर्व प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला.

मुंबई : बॉम्बे वाय. एम. सी. ए. (प्रोक्टर ब्रँच) तर्फे आयोजित सातव्या मुंबई डिस्ट्रीक्ट गुणांकन रोख पारितोषिकांच्या कॅरम स्पर्धेच्या चौथ्या फेरीच्या सामन्यात एअर इंडियाच्या राष्ट्रीय उपविजेता संदिप दिवेने एकतर्फी झालेल्या सामन्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भारत कोळीवर २५-४, २५-३ असा विजय मिळविताना दोन ब्रेक टू फिनिशची नोंद करून हॉलमधील सर्व प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला. दुसऱ्या एका तीन गेम रंगलेल्या सामन्यात तिसरा मानांकित वरळी स्पोर्टस्‌ क्लबच्या फ्रान्सिस फर्नांडीसला शिवताराच्या विवेक भारतीवर विजय मिळविताना ५-२५, २५-१५, २५-१८अशी कडवी झुंज द्यावी लागली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दिलीप सोसाने दोन गेम रंगलेल्या लढतीत तिसरा मानांकित टाटा स्पोर्टस्‌ क्लबच्या आविष्कार मोहितेचा २५-२३, २५-१० असा पराभव करून स्पर्धेत मोठी खळबळ माजवली. ही स्पर्धा मुंबई डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनच्या विद्यामाने वाय. एम. सी. ए. (प्रोक्टर ब्रँच) हॉल, उमरभाई पथ, आग्रीपाडा येथे वाय. एम. सी. ए. चे कार्याध्यक्ष श्री. शरद कांगा, प्रोग्रॅम कमिटी चेअरमन पीटर सेबॅस्टीयन, सरचिटणीस श्री. पॉल जॉर्ज व प्रोक्टर ब्रँच वाय. एम. सी. ए. चे चिटणीस श्री. भास्कर कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नीट आणि नेटक्या पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे सहकार्य लाभले आहे.

अग्रमानांकित आयकर विभागाच्या प्रफुल्ल मोरेने सरळ दोन गेममध्ये विजय कॅरम क्लबच्या लियाकत नागरजीचा २५-९, २५-१२ असा फाडशा पाडत विजयी कूच केली. वरळी स्पोर्टस्‌ क्लबच्या ऋषिकेश वाल्मिकीने तीन गेम रंगलेल्या लढतीत बेस्टच्या निलेश परबला २५-०, ७-२५, २५-९ असे निष्प्रभ करत आगेकूच केली. जागतिक व राष्ट्रीय विजेता रिझर्व्ह बँकेच्या प्रशांत मोरेने डी. जी. ए. च्या दिलीप काळेचा सरळ दोन गेममध्ये २५-४, २५-११ असा फाडशा पाडला.

बोरिचा स्पोर्टस्‌ क्लबच्या जितेंद्र राठोडने तीन गेम रंगलेल्या लढतीत डी. जी. ए. च्या जितेंद्र काळेचा २५-१५,  ७-२५, २५-१२ असा संघर्षपूर्ण विजय मिळवित पाचवी फेरी गाठली. वरळी स्पोर्टस्‌ क्लबच्या सलमान खानने तीन गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजेश खेडेकरचा २५-१, ८-२५, २५-८ असा विजय मिळवित आपले वर्चस्व सिद्ध केले.

महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात सबज्युनिअर राष्ट्रीय खेळाडू सेजल लोखंडेने आपली विजयी आगेकूच कायम ठेवत आयुर्विमा महामंडळाची ज्युनिअर राष्ट्रीय विजेती मानसी कदमचा २५-१४, २५-१७ असा सरळ दोन गेममध्ये पराभव  करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

दुसऱ्या एका सामन्यात माजी युवा राष्ट्रीय विजेती एस. एस. ग्रुपच्या मैत्रेयी गोगटेने दोन गेम रंगलेल्या लढतीत दुसरी मानांकित माजी राष्ट्रीय व राज्य विजेती रिझर्व्ह बँकेच्या संगीता चांदोरकरचा २५-१३, २५-१२ असा पराभव करून स्पर्धेत मोठी खळबळ माजवली.

या स्पर्धेत आतापर्यंत ७ ब्रेक टू फिनिश आणि ३ ब्लॅक टू फिनिशची नोंद झाली आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईAir Indiaएअर इंडिया