कॅरम​​​​​​​ : वसीम खान, सुमीत साटम, मंदार भरताव, शिशिर खडपे यांची आगेकूच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 05:44 PM2020-03-03T17:44:36+5:302020-03-03T17:44:57+5:30

अपना सहकारी बँकेच्या मंदार भरतावने दोन गेम रंगलेल्या लढती एस. टी. को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सचिन तावडेचा २५-६, २५-६ असा सहज पराभव करून आपले वर्चस्व सिद्ध करत उपांत्य फेरी गाठली.

Carrom: Wasim Khan, Sumit Satam, Mandar Bharata, Shishir Khadpe ahead in next round | कॅरम​​​​​​​ : वसीम खान, सुमीत साटम, मंदार भरताव, शिशिर खडपे यांची आगेकूच

कॅरम​​​​​​​ : वसीम खान, सुमीत साटम, मंदार भरताव, शिशिर खडपे यांची आगेकूच

Next

 को-ऑपरेटिव्ह बँक एम्ल्पॉईज युनियन तर्फे आयोजित ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कोंकण मर्कंटाईल को-ऑप. बँक लिमिटेड तर्फे पुरस्कृत आंतर सहकारी बँक कॅरम स्पर्धेच्या उप-उपांत्य फेरीच्या सामन्यात अपना सहकारी बँकेच्या मंदार भरतावने दोन गेम रंगलेल्या लढती एस. टी. को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सचिन तावडेचा २५-६, २५-६ असा सहज पराभव करून आपले वर्चस्व सिद्ध करत उपांत्य फेरी गाठली. दुसरा मानांकित सिटी बँकेच्या शिशिर खडपेने मर्कंटाईल बँकेच्या सोहेल मुकादमवर २५-९, २५-० अशी सहज मात करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. ही स्पर्धा को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे ऑफिस, शालिनी पॅलेस, दादर, मुंबई येथे अध्यक्ष माननीय खासदार श्री. आनंदराव अडसूळ, कार्याध्यक्ष श्री. सुनिल साळवी व सरचिटणीस श्री. नरेंद्र सावंत, खजिनदार श्री. प्रमोद पार्टे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळविण्यात येत आहे.

दुसऱ्या उप-उपांत्य फेरीच्या सामन्यात चेंबूर नागरिक सहकारी बँकेच्या सुमीत साटमने दोन गेम रंगलेल्या लढतीत मुंबई डिस्ट्रीक्ट को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या सत्तू कांबळेला २५-४, २५-६ अने नमवित आगेकूच केली. तिसरा मानांकित कोंकण मर्कंटाईल बँकेच्या वसीम खानने म्युनिसिपल बँकेच्या राहुल पडेलकरचा २५-७, २५-१४ असा संघर्षपूर्ण विजय मिळवित उपांत्य फेरी गाठली.

तत्पूर्वी झालेल्या उप-उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात कोंकण मर्कंटाईल बँकेच्या सोहेल मुकादमने तीन गेम रंगलेल्या संघर्षपूर्ण लढतीत अपना सहकारी बँकेच्या महादेव जाविरची कडवी झुंज २५-०, ०-२५, २५-० अशी मोडीत काढून उप-उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. दुसऱ्या एका सामन्यात मुंबई डिस्ट्रीक्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सत्तू कांबळेने सरळ दोन गेम रंगलेल्या लढतीत रत्नागिरीच्या दत्ताराम नार्वेकरचा २५-७, २५-१० असा पराभव करून आगेकूच केली.

महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या तीन गेम रंगलेल्या लढती म्युनिसिपल बँकेच्या अग्रमानांकित संध्या बापेरकरने आपल्या सहकारी संगीता बेंबडेचा २५-०, ११-२५, २५-८ असा संघर्षपूर्ण विजय मिळवित अंतीम फेरी गाठली. तसेच म्युनिसिपल बँकेच्या उषा कांबळेने दोन गेम रंगलेल्या लढतीत म्युनिसिपल बँकेच्याच मानसी पाटीलला २५-८, २५-६ असे नमवित अंतीम फेरीत प्रवेश मिळविला.

महिला दुहेरी गटाच्या अंतीम फेरीच्या सामन्यात म्युनिसिपल बँकेच्या अग्रमानांकित संध्या बापेरकर / उषा कांबळे यांनी एकतर्फी सरळ दोन गेममध्ये म्युनिसिपल बँकेच्याच मानसी पाटील / संगीता बेंबडे यांना २५-०, २५-४ अशी धुळ चारत विजेतेपद पटकाविले.

पुरुष दुहेरी गटाच्या उप-उपांत्य फेरीच्या सामन्यात बिनमानांकित मंदार भरताव / गितेश कोरगावकर यांनी चेंबूर नागरिक सहकारी बँकेच्या तिसरा मानांकित सुमीत साटम / शैलेश सावंत यांचा तीन गेम रंगलेल्या लढतीत ९-२५, २५-१, २५-० असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. अपना सहकारी बँकेच्या महादेव जाविर / संतोष कदम यांनी एस. टी. को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सचिन तावडे / संदेश चव्हाण यांचा २५-१, २५-४ असा धुव्वा उडवित आगेकूच केली. म्युनिसिपल बँकेच्या रवि गायकवाड / कल्याणजी परमार यांनी जनकल्याण सहकारी बँकेच्या  दिपक गायकवाड /   भार्गव धारगळकर यांचा ४-२५, २५-६, २५-८ असा तीन गेम रंगलेल्या लढतीत पराभव करून आगेकूच केली. म्युनिसिपल बँकेच्या नित्यानंद गिरकर / राजेश कांबळे यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या राजेंद्र फडके / विनायक आंगणे यांचा २५-१०, २५-३ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

Web Title: Carrom: Wasim Khan, Sumit Satam, Mandar Bharata, Shishir Khadpe ahead in next round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई