शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

कर्णधार बेलीवर एका सामन्याची बंदी

By admin | Updated: January 20, 2015 00:22 IST

तिरंगी मालिकेतील भारताविरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात कूर्मगती गोलंदाजी केल्याबद्दल आॅस्ट्रेलियाचा वन डे कर्णधार जॉर्ज बेली याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे.

मेलबोर्न : तिरंगी मालिकेतील भारताविरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात कूर्मगती गोलंदाजी केल्याबद्दल आॅस्ट्रेलियाचा वन डे कर्णधार जॉर्ज बेली याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. यामुळे २३ जानेवारी रोजी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तो खेळू शकणार नाही.आयसीसीने बेलीवर बंदी घातल्यामुळे इंग्लंडविरुद्ध सामन्यात स्टीव्हन स्मिथ आॅस्ट्रेलियाचे नेतृत्व करू शकतो. बेलीला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलेच; शिवाय त्याच्याकडून सामना शुल्काच्या २० टक्के रकमेचा दंडही आकारण्यात आला. संघातील अन्य खेळाडूंवर १० टक्के रकमेचा दंड लावण्यात आला आहे. बेलीने स्वत:ची चूक मान्य केल्यामुळे पुढील सुनावणी टळली. बेलीचे हे निलंबन आॅस्ट्रेलियासाठी विश्वचषकाच्या दृष्टीने लाभदायी मानले जाते. यानंतर त्याच्यावर बंदीची टांगती तलवार राहणार नाही. मायकेल क्लार्क जखमी असल्याने विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यात बेली आॅस्ट्रेलियाचे नेतृत्व करेल.भारताविरुद्ध आॅस्ट्रेलियाने ५० षटके टाकण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा २६ मिनिटे अधिक घेतली. आयसीसीने सप्टेंबरमध्ये ताकीद देताना म्हटले होते, की बेली किंवा द. आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्स हे येत्या वर्षभरात कूर्मगती गोलंदाजीत दोषी आढळले, तर सामना शुल्कातील रकमेचा दंड आणि एका सामन्याची बंदी लावली जाईल. बेली यात अलगद अडकला. (वृत्तसंस्था)