शहरं
Join us  
Trending Stories
1
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
2
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
3
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
4
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
5
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
6
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
7
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
8
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
9
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
10
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
11
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
12
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
13
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
14
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
15
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
16
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
17
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
18
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
19
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
20
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिस्बेन कसोटी: दिवसाखेर भारत ४ बाद ३११

By admin | Updated: December 17, 2014 13:16 IST

मुरली विजयच्या शानदार शतकाच्या(१४४) जोरावर भारताने दिवसाअखेर ४ गडी गमावत ३११ धावा केल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत

ब्रिस्बेन, दि. १७ - मुरली विजयच्या शानदार शतकाच्या(१४४) जोरावर भारताने दिवसाअखेर ४ गडी गमावत ३११ धावा केल्या आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाचे तीन गडी पटापट  धवन (२४), पुजारा (१८) व कोहली (१९) पटापट तंबूत परतल्याने भारताची अवस्था बिकट झाली होती मात्र मुरली विजयने (१४४) भारताचा डाव सावरला. मात्र लियॉनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाने सुटकेचा नि:श्वास टाकला. सध्या अजिंक्य रहाणे (नाबाद ७५) व रोहित शर्मा (२६) खेळत उद्या कसोटीच्या दुस-या दिवशी खेळपट्टीवर टिकून राहून मोठी धावसंख्या उभारायची जबाबादीर त्यांच्यावर आहे. ऑस्ट्रेलियातर्फे हेजलवूडने २ तर लियॉन व  मार्शने १ बळी टिपला. 
 
अ‍ॅडलेडवरील पहिल्या कसोटीत भारत अवघ्या ४८ धावांनी पराभूत झाला आणि ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली. मात्र, यशस्वी आणि अनुभवी कर्णधार महेंद्रसिंग धोनी परतल्यामुळे संघात नवचैतन्य आलेआहे. तर मायकेल क्लार्कच्या दुखापतीमुळे तरूण स्टिव्ह स्मिथ याच्याकडे आॅस्ट्रेलियाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
 
ऑस्ट्रेलिया संघ कर्णधारासह काही नव्या बदलांनी सामन्यात उतरला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने दुस-या कसोटीसाठी संघात जोश, हेजलवूड आणि मिशेल स्टार्क यांना स्थान दिले आहे. रियान हॅरिस व पिटर सिडल यांना विश्रांती देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त क्लार्कच्या जागी संघात शॉन मार्शचे आगमन झाले आहे.