शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
3
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
4
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
5
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
6
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
7
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
8
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
9
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
10
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
11
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
12
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
13
संपादकीय: या कॅन्सरला ‘नीट’ रोखा, तीन दशकांत अक्षरशः खोबरे झाले
14
भारत-पाकमधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कुणाचे? 
15
राजनैतिक थकव्याने एकाकी इराणला भारताचा(च) आधार!
16
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
17
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
18
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
19
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
20
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

ब्राझीलला हवा फक्त ड्रॉ

By admin | Updated: June 23, 2014 04:58 IST

पाच वेळा विश्वचॅम्पियन राहिलेला ब्राझील संघ उद्या, सोमवारी फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ‘अ’ गटात कॅमेरूनचा सामना करणार आहे़

ब्रासिलिया : पाच वेळा विश्वचॅम्पियन राहिलेला ब्राझील संघ उद्या, सोमवारी फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ‘अ’ गटात कॅमेरूनचा सामना करणार आहे़ या लढतीत ब्राझीलची बाजू वरचढ दिसत आहे़ दुसरीकडे स्पर्धेच्या बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर झालेला कॅमेरून संघ आपल्या अखेरच्या लढतीत सर्वोत्कृष्ट खेळ करण्याचा प्रयत्न करेल़
स्पर्धेतील ‘अ’ गटात ब्राझील संघ चार गुणांसह गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर विराजमान आहे़ त्यांना अंतिम १६ संघांत आपले स्थान निश्चित करण्यासाठी केवळ सामना बरोबरीत ठेवावा लागणार आहे़ कॅमेरून संघाला स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांत हार पत्करावी लागली होती़ त्यामुळे हा संघ स्पर्धेतून आधीच बाहेर झाला आहे़ त्यामुळे हा संघ ब्राझीलविरुद्ध विजय मिळवून स्पर्धेचा शेवट गोड करण्यासाठी उत्सुक असेल़
संघाच्या इतिहासावर नजर टाकल्यास यजमान ब्राझील संघाची बाजू वरचढ दिसते़ या दोन्ही संघांत झालेल्या चारपैकी तीनमध्ये ब्राझीलने विजय मिळविला आहे़ कॅमेरून संघाने २००३ च्या कन्फेडरेशन चषकात एकदा ब्राझीलवर मात केली होती़
आतापर्यंत झालेल्या २० विश्वचषकामध्ये खेळणारा ब्राझील हा एकमेव संघ आहे़ हा विश्वचषक ब्राझीलमध्ये होत असल्यामुळे हा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे़ संघांत नेमारसह जुलिओ सेजार, डॅनिएल एल्वेस, थियागो आणि डेव्हिड लुईससारखे उत्कृष्ट खेळाडू आहेत.या खेळाडूंच्या बळावर संघ कॅमेरूनविरुद्ध सहज विजय मिळवू शकतो़
दुसरीकडे कॅमेरून संघ १९९० मध्ये विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला होता़ हीच त्यांची विश्वचषकमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे़ त्यानंतर त्यांना एकदाही बाद फेरीत प्रवेश मिळविता आलेला नाही़ कॅमेरूनला स्पर्धेत मेक्सिकोकडून ०-१ आणि त्यानंतर क्रोएशियाने त्यांना ४-० असे पराभूत केले होते़
सलग दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे संघ बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे़ आपल्या अखेरच्या लढतीतही हा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांची नजर असणार आहे़ (वृत्तसंस्था)