Video : तो मुक्का जीवावर बेतला; प्रतिस्पर्धीचा चेहऱ्यावर पंच अन् बॉक्सरचा दुर्दैवी मृत्यू 

By स्वदेश घाणेकर | Updated: February 2, 2021 12:33 IST2021-02-02T12:33:13+5:302021-02-02T12:33:40+5:30

क्रीडा विश्वाला धक्का देणारा प्रसंग नुकताच घडला. प्रतिस्पर्धी बॉक्सरनं चेहऱ्यावर मारलेला मुक्का ३३ वर्षीय खेळाडूच्या जीवावर बेतला

Boxer Aslam Khan dies after knockout punch, Watch Video | Video : तो मुक्का जीवावर बेतला; प्रतिस्पर्धीचा चेहऱ्यावर पंच अन् बॉक्सरचा दुर्दैवी मृत्यू 

Video : तो मुक्का जीवावर बेतला; प्रतिस्पर्धीचा चेहऱ्यावर पंच अन् बॉक्सरचा दुर्दैवी मृत्यू 

क्रीडा विश्वाला धक्का देणारा प्रसंग नुकताच घडला. प्रतिस्पर्धी बॉक्सरनं चेहऱ्यावर मारलेला मुक्का ३३ वर्षीय खेळाडूच्या जीवावर बेतला. मोहम्मद असलम ( Muhammad Aslam Khan ) असे मृत झालेल्या बॉक्सरचे नाव आहे. कराचीतील एका स्थानिक क्लबमध्ये पाकिस्तानबॉक्सिंग काऊंसिलतर्फ आयोजित 'फाइट नाईट सीरिज' स्पर्धेत क्रूज वेट कॅटेगरीच्या बाऊटमध्ये मोहम्मद बली याच्याविरुद्ध तो रिंगमध्ये उतरला होता. या मॅच दरम्यान मोहम्मद असलमच्या चेहऱ्यावर मोहम्मद अलीनं जोरदार मुक्का मारला. त्यानंतर तो जमिनीवर कोसळला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. Video : चेंडू सीमारेषेपार जात असताना खेळाडू जर्सी बदलत राहिला अन् एकच हशा पिकला!

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात मोहम्मद असलम बेशुद्धावस्थेत रिंगवर पडलेला पाहायला मिळत आहे. प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार असलमला त्वरित नजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आणि तेथे त्याला आयसीयूत ठेवले गेले. पण, रविवारी दुपारी त्याचे निधन झाले. पाकिस्तानबॉक्सिंग फेडरेशननं या घटनेचा निषेध केला आहे आणि आयोजकांना खडे बोल सुनावताना या प्रकरणातून हात काढून घेतले. या स्पर्धेला त्यांनी अनधिकृत जाहीर केले. KKR चा अष्टपैलू खेळाडू बनला 'बाबा'; मुलाचा फोटो पोस्ट करून दिली गोड बातमी

पाहा व्हिडीओ... ३४ कोटींच्या घरात राहतेय विराट-अनुष्काची लेक 'वामिका'; पाहा आलिशान घराचे Inside Photo



 

Web Title: Boxer Aslam Khan dies after knockout punch, Watch Video