३४ कोटींच्या घरात राहतेय विराट-अनुष्काची लेक 'वामिका'; पाहा आलिशान घराचे Inside Photo

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हीनं कन्येचा पहिला फोटो सोमवारी सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यात तिच्यासोबत विराट कोहली ( Virat Kohli) हाही दिसत आहे. हा फोटो शेअर करून अनुष्कानं कन्येचं नाव वामिका ( Vamika) असं ठेवल्याचेही जाहीर केलं.

लेकीचा सोशल मीडियावरील पहिलाच फोटो शानदार बनवण्यासाठी अनुष्कानं विषेश कॅप्शनही लिहिली. तिनं लिहिले की,''आम्ही एकत्र प्रेम व कृतज्ञतेसह राहत होतो, परंतु या छोट्याशा वामिकानं आमच्या आनंदात आणखी भर टाकली. रडणं, हसणं, चिंता, आनंद या सर्व भावना आम्ही एका क्षणात अनुभवल्या. तुम्ही दाखवलेलं प्रेम व प्रार्थना यासाठी आभारी आहे.''

विराट व अनुष्का यांनी त्यांच्या मुलीचं नाव वामिका ( Vamika) असे ठेवले आहे. असं नाव ठेवण्यामागे एक खास कारण आहे. पण, दोघांच्याही चाहत्यांना हे असं नाव का ठेवलं आणि त्याचा अर्थ काय, हा प्रश्न पडला आहे.

विराट व अनुष्का यांच्याप्रमाणे मुलीचं नावही खास आहे. वामिकाचे नाव विराट व अनुष्का या दोघांच्या नावाला जोडून ठेवण्यात आले आहे. यात विराटचा 'व' आणि अनुष्काचा 'का' याचा समावेश आहे. वामिकाचा अर्थ होतो देवी दुर्गा... हे नाव दुर्गा देवीच्या नावापैकी एक आहे. अनुष्कानं ही पोस्ट केल्यानंतर मिनिटांतच लाखोंनी त्यावर लाईक्सचा पाऊस पाडला.

विराट कोहली-अनुष्का शर्मा यांची लेक वामिका ही ३४ कोटींच्या आलिशान अपार्टमेंटमध्ये राहत आहे. विराट-अनुष्कानं 2016मध्ये हा अपार्टमेंट खरेदी केला होता. मुंबईच्या वरळी येथील ओमकार 1973 येथे त्यांचा हा अपार्टमेंट आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे देशातील सर्वात चर्चिले जाणारे कपल. एकमेकांना अनेक वर्ष डेट केल्यानंतर 11 डिसेंबर 2017मध्ये या दोघांनी इटलीत विवाह केला. लग्नानंतर हे दोघंही मुंबईतील आलिशान अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले.

विरुष्कानं 34 कोटींमध्ये हा आलिशान आपार्टमेंट खरेदी केला. याच अपार्टमेंटच्या टॉवर C मध्ये युवराज सिंगचाह फ्लॅट आहे. चला मग त्यांच्या आलिशान अपार्टमेंटची सफर करूया...