Abu Dhabi T10 League: Shirtless Rohan Mustafa chases the ball, concedes four runs,  Video | Video : चेंडू सीमारेषेपार जात असताना खेळाडू जर्सी बदलत राहिला अन् एकच हशा पिकला!

Video : चेंडू सीमारेषेपार जात असताना खेळाडू जर्सी बदलत राहिला अन् एकच हशा पिकला!

संयुक्त अरब अमिराती ( UAE) हे क्रिकेटचे हॉटस्पॉट बनत चाललं आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२०च्या यशस्वी आयोजनानंतर येथे T 10 League चा थरार रंगला आहे. रोहन मुस्तफा ( Rohann Mustafa) हा UAE क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू. त्यानं ३९ वन डे आणि ४३ ट्वेंटी-२० सामन्यांत १५०० हून अधिक धावा केल्या आहेत. ३२ वर्षीय खेळाडूच्या नावावर १ शतक व ५ अर्धशतकांचा समावेश आहे. पण, हा खेळाडू सोमवारी वेगळ्याच कारणानं चर्चेला आला.  KKR चा अष्टपैलू खेळाडू बनला 'बाबा'; मुलाचा फोटो पोस्ट करून दिली गोड बातमी

रोहन मुस्तफा सध्या अबु धाबी टी १० लीगमध्ये खेळत आहे. टीम अबु धाबी संघाचे तो प्रतिनिधित्व करत आहे आणि नॉर्दर्न वॉरियर्स संघाविरुद्ध खेळताना एक विचित्र प्रकार घडला. रोहननं यावेळी प्रतिस्पर्धी वॉरियर्स संघाला चार धावा दान केल्या आणि या प्रकारानंतर कुणीच चिडलं नाही तर स्टेडियमवर एकच हशा पिकला. ३४ कोटींच्या घरात राहतेय विराट-अनुष्काची लेक 'वामिका'; पाहा आलिशान घराचे Inside Photo

त्याचं नेमकं झालं असं की,  १२४ धावांचा पाठलाग करताना वॉरियर्सच्या फलंदाजानं जोरदार फटका मारला. सीमारेषेपार जाणारा चेंडू सहज अडवता आला असता, परंतु नेमका त्याचवेळी रोहन जर्सी बदलत होता. हा सर्व प्रकार पाहून सर्वच हसू लागले.  क्वारंटाईन कालावधी संपला अन् टीम इंडियाचे शिलेदार मैदानावर सरावासाठी उतरले, See pics

पाहा व्हिडीओ...प्रथम फलंदाजी करताना अबु धाबी संघानं १० षटकांत ३ बाद १२३ धावा केल्या.  जो क्लार्कनं २४ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकार खेचून ५० धावा केल्या. ख्रिस गेल व पॉल स्टीर्लिंग अपयशी ठरले.  बेन डकेटनं १७ चेंडूंत ३४ धावा, तर ल्युक राईटनं १५ चेंडूंत ३३ धावा चोपल्या.  प्रत्युत्तरात लेंडल सिमन्स आणि वसीम मुहम्मद यांनी पहिल्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी करून संघाचा विजय पक्का केला. मुहम्मदनं ३४ चेंडूंत ७ चौकार व  ६ षटकार खेचून ७६ धावा केल्या. सिमन्स ३७ धावांवर नाबाद राहिला. वॉरियर्सनं हा सामना ८ विकेट्स राखून जिंकला. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Abu Dhabi T10 League: Shirtless Rohan Mustafa chases the ball, concedes four runs,  Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.