शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

आंदळकर सर्वोत्कृष्ट मल्ल ते आदर्श वस्ताद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 2:57 AM

स्पर्धात्मक कुस्ती खेळणे थांबविल्यानंतर या क्षेत्रात प्रशिक्षक म्हणून स्वत:ला वाहून घेतले

पुणे/कोल्हापूर : वयाच्या २५व्या वर्षी कुस्तीक्षेत्रातील एक मानदंड ठरलेली हिंदकेसरी गदा पटकावणाऱ्या गणपत आंदळकर यांनी स्पर्धात्मक कुस्ती खेळणे थांबविल्यानंतर या क्षेत्रात प्रशिक्षक म्हणून स्वत:ला वाहून घेतले ते आजतागायत! पहाटे पाच आणि सायंकाळी चार वाजता श्री शाहू छत्रपती न्यू मोतीबाग तालमीत जाण्याचा शिरस्ता जोडला तो अखेरपर्यंत कायम होता.त्यांच्या चुरशीच्या झालेल्या लढती१९५८मध्ये नसीर पंजाबी याच्यासोबत गणपत आंदळकरांची कुस्ती झाली. खासबाग कुस्ती मैदानावर तीस हजार शौकिनांच्या साक्षीने आंदळकरांनी नसीरला चारी मुंड्या चितपट केले.१९६४ मध्ये सादिक पंजाबी या गाजलेल्या मल्लासोबत आंदळकरांची कुस्ती येथील खासबागेत झाली. शौकिनांची मैदानावर मोठी गर्दी केली होती. अर्धा तास चाललेल्या कुस्तीत आंदळकरांनी सादिकला ताकदीच्या जोरावर ताब्यात जखडून ठेवले. समोर पराभव दिसतोय म्हटल्यावर सादिकचे वडील निक्का पंजाबी यांनी कुस्ती सोडविण्याची विनंती पंचांकडे केली. त्यामुळे आंदळकर यांना विजयी घोषित करण्यात आले.१९६१ मध्ये शाहूपुरी तालमीचे नामवंत मल्ल महंमद हनीफ यांच्याबरोबरच्या लढतीत आंदळकर जिंकले. पोलीस कल्याण निधीसाठी कसबा बावडा येथील पोलीस मैदानावर ही कुस्ती झाली. त्यासाठी खास आखाडा तयार करण्यात आला होता. हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांच्याशी आंदळकरांची कुस्ती मुंबईत झाली. दोघेही मल्ल कोल्हापूरचे आणि नावाजलेले असल्याने या कुस्तीकडे राज्यातील कुस्तीशौकिनांचे लक्ष लागले होते. एका चालीवेळी कुस्ती कडेला गेल्याने पंचांनी कुस्तीचा निकाल दिला नाही. या कुस्तीदरम्यान थोडा वादही झाला. शेवटी ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.भूषविलेली पदेमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष.महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेचे सदस्य.कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष.राजर्षी छत्रपती मोतीबाग तालीम मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष.राज्य कुस्तीगीर परीषदेच्या चीफ पेट्रन कमिटीचे सदस्य.स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या पश्चिम विभागाचे संचालक.महाराष्ट्र राज्य स्पोर्ट्स कौन्सिलचे सदस्य.

टॅग्स :Wrestlingकुस्ती