शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआयला ‘फायनल वॉर्निंग’

By admin | Updated: October 7, 2016 02:50 IST

निवृत्त न्या. आर. एम. लोढ समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर भूमिका घेताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) २४ तासांचा अंतिम वेळ

नवी दिल्ली : निवृत्त न्या. आर. एम. लोढ समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर भूमिका घेताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) २४ तासांचा अंतिम वेळ दिला आहे. त्याच वेळी, जर का बीसीसीआयने लोढा शिफारशी लागू करण्यास मनाई केली, तर त्यानंतर न्यायालय आदेश देईल, की बोर्डाच्या सर्व विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या जागी प्रशासकांच्या समितीची नियुक्ती व्हावी, असेही सर्वोच्च न्यायालयाने खडसावले.त्याच वेळी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचे वकील कपिल सिब्बल यांनाही बोर्डासह चर्चा करून शुक्रवारपर्यंत आपले उत्तर देण्यास सांगितले. दरम्यान, सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे याप्रकरणी काही वेळ मागितला होता. मात्र, न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळली, अशी माहितीची या वेळी मिळाली.क्रिकेटविश्वातील सर्वांत श्रीमंत संघटना असलेल्या बीसीसीआयला या वेळी सर्वोच्च न्यायालयाने थेट फटकारताना विचारले, की ‘तुम्ही लोढा समितीच्या शिफारशी लागू करणार आहात की नाही?’ सर्वोच्च न्यायालयाने कानउघाडणी करताना सांगितले, की ‘तुम्ही वेळेचा अपव्यय करणे बंद करा. एक वचनपत्र द्या, की तुम्ही लोढा समितीच्या शिफारशी लागू करणार आहात. नाही तर आम्हाला नाइलाजाने आदेश द्यावा लागेल.’त्याच वेळी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला आपल्या राज्य संघटनांना पैसे न देण्याबाबतही निर्देश केले आहेत. लोढा समितीच्या या शिफारशीलाही बीसीसीआयने विरोध केला होता. याबाबत ठाकूर म्हणाले, ‘‘ज्या राज्य संघटना सुधारण्यास तयार नाहीत, त्यांना पैसे दिले जाऊ नयेत. त्यांना पैशांची मागणी करण्याचा अधिकार नाही. तसेही तुम्हाला पैसे देण्याबाबत चर्चा करण्याची इतकी घाई का आहे?’’ तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना बीसीसीआयचे वकील कपिल सिब्बल यांनी सांगितले होते, की बीसीसीआयने समितीच्या शिफारशी मान्य करण्याचे कधीच टाळले नाही. (वृत्तसंस्था)कोणत्याही अटीशिवाय लोढा शिफारशी लागू करण्याबाबतचे वचनपत्र त्यांनी न्यायालयाकडे द्यावे. नाही तर यानंतर न्यायालय आपला आदेश जाहीर करेल. ठाकूर म्हणाले, ‘‘जर बीसीसीआय वचनपत्र देण्यास कोणती टाळाटाळ करीत असेल, तर न्यायालय शुक्रवारी आपला आदेश देईल.- टी. एस. ठाकूर, सरन्यायाधीश गेल्याच आठवड्यात लोढा समितीने सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थिती अहवाल सादर करताना बीसीसीआयविरुद्ध आरोप केले होते, की बोर्ड सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पलन करीत नसून बोर्डामध्ये कोणतीही सुधारणा करीत नाही. शिवाय समितीने सुचविलेल्या शिफारशी लागू करण्यासही बीसीसीआय टाळाटाळ करीत आहे.बीसीसीआयचे म्हणणे असे आहे, की लोढा समितीच्या शिफारशी भारतीय क्रिकेटसाठी योग्य नसून त्यामुळे क्रिकेट बोर्ड पूर्णपणे कमजोर होईल. त्याच वेळी दुसरीकडे, लोढा समितीने सांगितले, की या शिफारशी बीसीसीआयला पारदर्शी करण्यासाठी तयार करण्यात आल्या होत्या.सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली बाजू मांडताना, लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशी लागू करण्यास आम्ही कधीही टाळाटाळ केली नसल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.बीसीसीआयच्या सर्व सदस्यांची बैठक झाली होती. या वेळी अनेक शिफारशींचा वोटिंगद्वारे विरोध झाला होता. लोढा समितीला पाठविलेल्या सर्व ४० ई-मेलची माहिती न्यायालयाला दिली जाईल. तसेच, आम्ही समितीच्या ई-मेलना कोणतेही उत्तर दिले नसल्याची माहिती पूर्णपणे चुकीची आहे.- कपिल सिब्बल,बीसीसीआयचे वकील