बाणावलीचा शानदार विजय
By admin | Updated: December 2, 2014 00:36 IST
आंतरकेंद्र फुटबॉल स्पर्धा : सिबर्न फर्नांडिसची हॅट्ट्रिक
बाणावलीचा शानदार विजय
आंतरकेंद्र फुटबॉल स्पर्धा : सिबर्न फर्नांडिसची हॅट्ट्रिकपणजी : वोडाफोनच्या सहकार्याने गोवा फुटबॉल विकास महामंडळाने आयोजित केलेल्या फुटबॉल महोत्सवातील आंतर केंद्र स्पर्धेतील १० वर्षांखालील मुलांच्या गटात बाणावली संघाने उतोर्डावर ५-० ने विजय नोंदवला. या सामन्यात सिबर्न फर्नांडिसने हॅट्ट्रिक नोंदवली. क्लेन आणि रिची फर्नांडिस यांनीही गोल नोंदवत विजयात वाटा उचलला. दुसर्या सामन्यात, १३ वर्षांखालील मुलांच्या गटात, बाणावलीने उतोर्डाचा ४-० ने पराभव केला. या सामन्यात ॲस्ट्रोन रॉड्रिगीसने दोन गोल नोंदवले.१० वर्षांखालील मुलांच्या सामन्यात साखळीने माशेलवर २-० ने विजय नोंदवला. सामन्यात डायलोन गोम्स आणि सुयश नाईक यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. अन्य सामन्यात, आंबेलीने पहिला विजय मिळवला. त्यांनी शिरोडा संघाचा पराभव केला. (क्रीडा प्रतिनिधी)