कोरोनाशी मुकाबला; भारताच्या कुस्तीपटूनं दिला सहा महिन्यांचा पगार  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 02:39 PM2020-03-24T14:39:14+5:302020-03-24T14:40:06+5:30

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी सर्व स्तरातून मदतीचा ओघही वाढत चालला आहे.

Bajrang Punia To Donate Six Months Salary To Combat Coronavirus svg | कोरोनाशी मुकाबला; भारताच्या कुस्तीपटूनं दिला सहा महिन्यांचा पगार  

कोरोनाशी मुकाबला; भारताच्या कुस्तीपटूनं दिला सहा महिन्यांचा पगार  

Next

भारतातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. देशातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 511 इतकी झाली आहे, तर मृतांचा आकडा 10 वर गेला आहे. जगभरात आतापर्यंत कोरोना संक्रमितांचा आकडा हा 382,366 इतका झाला आहे. त्यापैकी बरे होणाऱ्यांची संख्या ही 102,505 इतकी आहे, पण 16,568 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे सर्व स्तरातून मदतीचा ओघही वाढत चालला आहे. भारताचा अव्वल कुस्तीपटू बजरंग पुनियानंही त्याचा सहा महिन्यांचा पगार हरयाणा राज्य सरकारला देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना व्हायरसशी संघर्ष करण्यासाठी हरयाणा राज्य सरकारही पुढाकार घेत आहे. त्यांना मदत करण्यासाठी आता बजरंग पुनियाने पुढाकार घेतला आहे. 25 वर्षीय बजरंग पुनियानं सोशल मीडियावरून ही घोषणा केली आहे. 2019च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता बजरंग रेल्वेत ऑफिस ऑन स्पेशल ड्युटी ( OSD) पदावर कामावर आहे. ''मी सहा महिन्याचा पगार दान करण्याचा निर्णय घेतला आहे,''असे बजरंगने सांगितले. त्याच्या या पुढाकाराचा केंद्रीय क्रीडा मंत्री किरन रिजीजूनं  कौतुक केले.

यावेळी बजरंगनं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्याच्या मागणीला पाठींबा दर्शवली. पीटीआय या वृत्तसंस्थेशी तो बोलताना म्हणाला,''ऑलिम्पिकपूर्वी आपला लढा हा कोरोना व्हायरसशी आहे. परिस्थिती सुधरली नाही आणि 2-3 महिने असेच सुरू असेल. तर ऑलिम्पिक पुढे ढकलणेच योग्य ठरेल.''


  
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी श्रीलंका क्रिकेट मंडळाचा पुढाकार; सरकारला कोट्यवधींची मदत
श्रीलंकेलाही कोरोना व्हायरसशी झळ पोहोचली आहे. या व्हायसरशी मुकाबला करण्यासाठी तेथील सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या मदतीला श्रीलंका क्रिकेट धावून आले आहेत. त्यांनी सरकारला 1 कोटी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेता आतापर्यंत या व्हायरसमुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे.  श्रीलंका क्रिकेटनं सरकारला मदत करण्याची घोषणा ट्विटरवरून केली आहे. ''कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी सरकारला 1 कोटींची मदत करण्याचा निर्णय श्रीलंका क्रिकेटने घेतला आहे,'' अशी त्यांनी माहिती दिली. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Coronavirusमुळे श्रीमंत फुटबॉलपटूंना मोठा फटका; वाचून तुम्हाला बसेल धक्का...

इंग्लंडच्या क्रिकेटपटूंचा स्तुत्य उपक्रम; पबचे बनवले किराणा दुकान, वाचवला अनेकांचा रोजगार

IPL 2020 रद्द? फ्रँचायझी मालकाचे स्पष्ट संकेत; BCCI ला 2000 कोटींचे नुकसान

Video : जगातला अव्वल अष्टपैलू क्रिकेटर आयसोलेशनमध्ये; मुलीला पाहता येत नसल्यानं झाला भावुक

 

Web Title: Bajrang Punia To Donate Six Months Salary To Combat Coronavirus svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.