Australian Open: 'वॉकओव्हर' ट्विस्ट अन् जोकोविचला सेमी फायनलची लॉटरी! फेडररचा विक्रमही मोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 19:36 IST2026-01-28T19:35:35+5:302026-01-28T19:36:41+5:30

लक फॅक्टरसह जोकोविचच्या नावे झाली ऐतिहासिक विजयाची नोंद

Australian Open 2026 Novak Djokovic gets walkover in Australian Open quarterfinal after losing 2 sets breaks Federer's record Now vs Jannik Sinner Semi Final | Australian Open: 'वॉकओव्हर' ट्विस्ट अन् जोकोविचला सेमी फायनलची लॉटरी! फेडररचा विक्रमही मोडला

Australian Open: 'वॉकओव्हर' ट्विस्ट अन् जोकोविचला सेमी फायनलची लॉटरी! फेडररचा विक्रमही मोडला

ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य पूर्व फेरीत इटलीच्या लॉरेन्झो मुसेटीविरुद्ध वॉकओव्हरचा ट्विस्टमुळे सर्बियन टेनिसपटू नोव्हाक जोकोविचला उपांत्य फेरीची लॉटरी लागल्याचे पाहायला मिळाले. मुसेटीने या लढतीतील पहिले दोन सेट जिंकले होते. एवढेच नाहीतर तिसऱ्या सेटमध्येही तो जोकोविचला पराभूत करण्याच्या मार्गावर होता. पण दुखापतीमुळे त्याने सामन्यातून माघार घेतली अन् जोकोविचला पुढच्या फेरीत प्रवेश करण्याची संधी मिळाली. आता उपांत्य फेरीत त्याच्यासमोर इटलीच्याच यानिक सिनरचं तगडे आव्हान असणार आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

लक फॅक्टरसह जोकोविचच्या नावे झाली ऐतिहासिक विजयाची नोंद

वर्षातील पहिल्या वहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेतील उपांत्य पूर्व लढतीत पराभवाच्या छायेत असताना मिळालेल्या विजयासह जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा रॉजर फेडररचा विक्रमही मोडला आहे. जोकोविचनं मेलबर्नमधील या ग्रँडस्लॅम स्पर्धेत एकूण १०३ सामने जिंकले आहेत, तर फेडररने आपल्या कारकिर्दीत १०२ सामने जिंकल्याचा रेकॉर्ड आहे. पाचव्या मानांकित मुसेटीला तिसऱ्या सेटच्या पहिल्याच सर्व्हिस गेममध्ये ग्रोइनला दुखापत झाली आणि तो धावू शकत नव्हता. त्याने सामना सोडण्याचा निर्णय घेतला आणि जोकोविचला अनपेक्षित विजय मिळाला.

जोकोचा ऐतिहासिक ४०० वा विजय, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये फेडररच्या विक्रमाशी बरोबरी

मुसेटीबाबत जोकोविचचे विधान

जोकोविचने मुसेटीबद्दल सहानुभूती व्यक्त केली आणि मान्य केले की, तो इटालियन खेळाडूविरुद्ध सामना गमावण्याच्या स्थितीत  होता. मुसेटीच हा सामना जिंकायला हवा होता, असेही त्याने स्पष्ट केले. सामन्यानंतर जोकोविच म्हणाला, "त्याच्याबद्दल मला वाईट वाटतं, एवढंच मी सांगू शकतो. तो खूपच चांगला खेळत होता. मी आज घरी जाण्याच्या मार्गावर होतो. ग्रँडस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत दोन सेट्सची आघाडी आणि पूर्ण नियंत्रण असताना जे घडलं ते खूप दुर्दैवी आहे. आज तोच विजेता असायला हवा होता, यात शंका नाही."

फायनल गाठण्यासाठी  सिनर विरुद्ध जोकोविच यांच्यात रंगणार सामना 

टेनिस जगातील दुसऱ्या क्रमांकाचा टेनिसपटू यानिक सिनर आणि नोवाक जोकोविच यांच्यात ऑस्ट्रेलियन ओपनचा सेमीफायनल सामना रंगणार आहे. मेलबर्नमध्ये सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी या दोघांमध्ये लढत पाहायला मिळले.  गतविजेता सिनरने सरळ सेटमध्ये विजय नोंदवत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. दुसरीकडे विक्रमी १० वेळचा ऑस्ट्रेलियन ओपन विजेता नोव्हाक जोकोविच नशिबाच्या जोरावर अंतिम चारमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे.

Web Title : ऑस्ट्रेलियन ओपन: वॉकओवर के बाद जोकोविच आगे, फेडरर का रिकॉर्ड तोड़ा

Web Summary : मुसेटी की चोट के बाद जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन के सेमीफाइनल में पहुंचे। उन्होंने टूर्नामेंट में सबसे ज्यादा जीत के लिए फेडरर का रिकॉर्ड तोड़ा। जोकोविच ने मुसेटी के मजबूत प्रदर्शन को स्वीकार किया और माना कि वे भाग्यशाली थे। अब उनका मुकाबला सिनर से होगा।

Web Title : Australian Open: Djokovic Advances After Walkover, Breaks Federer's Record

Web Summary : Djokovic advanced to the Australian Open semi-final after Musetti's injury. He surpassed Federer's record for most wins at the tournament. Djokovic acknowledged Musetti's strong performance and admitted he was fortunate to win. He will now face Sinner.