भारताच्या महिला खेळाडूवर प्राणघातक हल्ला; तीन आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 07:12 PM2020-01-22T19:12:25+5:302020-01-22T19:16:56+5:30

हा हल्ला कर्नाटक कबड्डी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचे वृत्त आहे.

Attack on usha rani Indian Kabaddi player in India; Three accused arrested | भारताच्या महिला खेळाडूवर प्राणघातक हल्ला; तीन आरोपींना अटक

भारताच्या महिला खेळाडूवर प्राणघातक हल्ला; तीन आरोपींना अटक

Next

मुंबई : भारताची महिला कबड्डीपटू उषा राणीवर प्राणघातक हल्ला केल्याचे वृत्त पुढे आले आहे. उषा गेल्यावर्षी झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय संघाबरोबर होती. या स्पर्धेत भारतीय संघाने रौप्यपदकाची कमाई केली होती.

उषा ही कर्नाटकची स्टार कबड्डीपटू आहे. पण बंगळुरु येथे उषावर हा हल्ला झाला आहे. हा हल्ला कर्नाटक कबड्डी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचे वृत्त आहे. कारण याप्रकरणी कर्नाटक कबड्डी संघटनेचे सचिव मणीराजू, माजी कबड्डीपटू बी.सी. रमेश आणि नरसिंहा या तिघांना अटक करण्यात आली आहे.

कर्नाटक कबड्डी संघटनेमध्ये उषा राणी ही आपल्या वरिष्ठांची कनिष्ठ खेळाडूंबरोबर ओळख करून देत होती. उषाते वरिष्ठ हे पोलीस खात्यामध्ये कामाला आहे. त्यानंतर मणीराजू, बी.सी. रमेश आणि नरसिंहा यांनी उषावर प्राणघातक हल्ला  केल्याचे पुढे आले आहे. या तिघांवर आयपीसी कोड ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या तिघांनाही जामीन मिळणार नाही.
 

Web Title: Attack on usha rani Indian Kabaddi player in India; Three accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.