धक्कादायक! विदेशी ॲथलेटिक्स कोच मृतावस्थेत आढळले

धक्कादायक! विदेशी ॲथलेटिक्स कोच मृतावस्थेत आढळले

पतियाळा : मध्यम आणि लांब पल्ल्याच्या धावपटूंचे कोच निकोलई स्त्रसारेव हे राष्ट्रीय क्रीडा संस्थेतील वसतिगृहाच्या खोलीत मृतावस्थेत आढळले.

बेलारुसच्या ७२ वर्षांच्या कोचचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. शुक्रवारी येथे आयोजित इंडियन ग्रॅन्डप्रिक्ससाठी ते बेंगळुरू येथून पतियाळाला आले होते, अशी माहिती एएफआयचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी दिली.

स्पर्धास्थळी ते पोहोचू न शकल्याने शोधाशोध सुरू झाली होती. त्यांच्या खोलीचे दार तोडण्यात आल्यानंतर ते बिछान्यावर पडलेले आढळून आले. साईच्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूचे कारण कळू शकले नाही.

Web Title: athletics coach Nikolai Snesarev found dead at NIS Patiala hostel room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.