आशियाई ज्युनिअर बॉक्सिंग: तनू, निकिता, विशू राठी अंतिम फेरीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 06:02 IST2021-08-28T06:02:22+5:302021-08-28T06:02:33+5:30

स्पर्धेत भारताचे एकूण सहा बॉक्सर्स अंतिम फेरीत पोहोचले  आहेत.

Asian Junior Boxing: Tanu, Nikita, Vishu Rathi in the final pdc | आशियाई ज्युनिअर बॉक्सिंग: तनू, निकिता, विशू राठी अंतिम फेरीत 

आशियाई ज्युनिअर बॉक्सिंग: तनू, निकिता, विशू राठी अंतिम फेरीत 

दुबई : येथे सुरू असलेल्या आशियाई ज्युनिअर अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत तनू (५२ किलो), निकिता चंद (६० किलो) आणि विशू राठी (४८ किलो) यांनी आपापल्या गटात चमकदार खेळ करताना स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. 

यासह भारताच्या सुवर्ण पदकाच्या आशा आणखी उंचावल्या आहेत. तनूने एकतर्फी सामन्यात बाजी मारताना नेपाळच्या स्वस्तिका हिला ५-० असे नमवले. निकितानेही सहजपणे अंतिम फेरी गाठताना उझबेकिस्तानच्या मुखुसा तोखिरोवा हिचा ५-० असा पाडाव केला. त्याचवेळी, राठीने दोन मिनिटांहून कमी वेळ घेत मंगोलियाच्या ओत्गोंबात येसुंखुस्लेन हिला नमवले.दु सरीकडे, भारताच्या आशिष (५४ किलो) आणि अंशूल (५७ किलो) यांना मात्र आपापल्या गटातील उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे या दोघांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत भारताचे एकूण सहा बॉक्सर्स अंतिम फेरीत पोहोचले  आहेत.

Web Title: Asian Junior Boxing: Tanu, Nikita, Vishu Rathi in the final pdc