Asian Games 2023 : भारताचे नेमबाज लढले; कोरियन खेळाडूंना पदकासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 09:07 AM2023-09-26T09:07:45+5:302023-09-26T09:10:33+5:30

Asian Games 2023, Hockey : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये Shooting 10m Air Rifle Mixed Team नेमबाजीत दिव्यांक्ष सिंग आणि रमिता यांना मिश्र सांघिक गटाचे कांस्यपदकाने थोडक्यात हुलकावणी दिली.

Asian Games 2023 : Ramita Jindal & Divyansh Panwar miss OUT on a Bronze medal in 10m Air Rifle Mixed Team event (Shooting), The Indian duo were leading 8-0 initially but lost 18-20 eventually in thrilling shoot-off.   | Asian Games 2023 : भारताचे नेमबाज लढले; कोरियन खेळाडूंना पदकासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले

Asian Games 2023 : भारताचे नेमबाज लढले; कोरियन खेळाडूंना पदकासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले

googlenewsNext

Asian Games 2023, Hockey : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये Shooting 10m Air Rifle Mixed Team नेमबाजीत दिव्यांक्ष सिंग आणि रमिता यांना मिश्र सांघिक गटाचे कांस्यपदकाने थोडक्यात हुलकावणी दिली. 


१० मीटर एअर रायफल मिश्र गटात पहिल्या राऊंडमध्ये भारतीय जोडीने जबरदस्त पुनरागमन केले आणि कांस्यपदकाच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवले होते. कांस्यपदकाच्या लढतीत भारतीय नेमबाजांनी चांगली सुरूवात करताना दक्षिण कोरियाच्या हाजून पार्क व इयून्सेओ ली या जोडीवर पहिल्या फेरीत ६-० अशी आघाडी मिळवली. पण, कोरियन खेळाडूंनी मॅच ९-९ अशी बरोबरीत आणली. मात्र, भारतीय जोडी हार मानणारी नव्हती आणि त्यांनी चांगली टक्कर दिली. शेवटच्या राऊंडपर्यंत कोरियाने १५-१५ अशी बरोबरी मिळवली. त्यानंतर १७-१७ व १८-१८ अशी बरोबरी झाली अन् पुन्हा दोन्ही संघांमध्ये एका राऊंडची मॅच झाली. यावेळी कोरियन खेळाडूंचा अनुभव कामी आला अन् त्यांनी २०-१८ अशी बाजी मारून कांस्यपदक नावावर केले.


भारतीय पुरुष संघाने आज अ गटातील दुसऱ्या सामन्यात सिंगापूरवर  १६-१ असा दणदणीत विजय मिळवला. पहिल्या सामन्यात त्यांनी उझबेकिस्तानवर १६-० असा दणदणीत विजय मिळवता होता. आज मनदीप सिंग ( १२ मि., ३० मि. व ५१ मि.) याची हॅटट्रीक अन् कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या ( २४मि. ३९ मि., ४०मि. व ४२ मि.) चार गोल्सच्या जोरावर भारताने  हा विजय मिळवला. व्हीएस प्रसाद ( २३ मि.), गुरजंत सिंग ( २२ मि.), उपाध्याय ( १६ मि.), शमशेर सिंग ( ३८ मि.), मनप्रीत सिंग ( ३७ मि.) आणि अभिषेक ( ५१ मि. ५२ मि.) यांनी दमदार खेळ केला.  
 

Web Title: Asian Games 2023 : Ramita Jindal & Divyansh Panwar miss OUT on a Bronze medal in 10m Air Rifle Mixed Team event (Shooting), The Indian duo were leading 8-0 initially but lost 18-20 eventually in thrilling shoot-off.  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.