Asian Games 2023 : खेळाडूचा मोबाईल हरवला, कर्मचाऱ्यांनी रात्र जागून हजारो कचऱ्याच्या बॅग्समध्ये केली शोधाशोध अन्...  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 12:29 PM2023-09-26T12:29:22+5:302023-09-26T12:29:38+5:30

Asian Games 2023 :  स्टेडियममध्ये आपला मोबाईल हरवला, तर कोणीही तो शोधण्यापेक्षा सोडून देणं पसंत करेल.

Asian Games 2023 : A group of volunteers sifted through tens of thousands of rubbish bags throughout the night and helped 12-year-old Liu Tian-yi, a chess player for Hong Kong, China, find her lost device.  | Asian Games 2023 : खेळाडूचा मोबाईल हरवला, कर्मचाऱ्यांनी रात्र जागून हजारो कचऱ्याच्या बॅग्समध्ये केली शोधाशोध अन्...  

Asian Games 2023 : खेळाडूचा मोबाईल हरवला, कर्मचाऱ्यांनी रात्र जागून हजारो कचऱ्याच्या बॅग्समध्ये केली शोधाशोध अन्...  

googlenewsNext

Asian Games 2023 :  स्टेडियममध्ये आपला मोबाईल हरवला, तर कोणीही तो शोधण्यापेक्षा सोडून देणं पसंत करेल. विशेषत: त्या स्टेडियममध्ये आशियाई स्पर्धा २०२३ चे आयोजन होत असताना.  हाँगकाँगच्या १२ वर्षीय बुद्धिबळपटू लिऊ तियान-यी  हिचा मोबाईल स्टेडियममध्ये हरवला. शनिवारी रात्री ती आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी चीनला पोहोचली. आशियाई क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा हांगझू ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटर स्टेडियमवर पार पडला आणि लिऊ खूप उत्साहित होती. Liu Tian-Yi ने संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद लुटला पण जेव्हा तिला कळले की त्याच्याकडे मोबाईल फोन नाही तेव्हा तिला खूप वाईट वाटले. 


लिऊने नेमका मोबाईल कुठे हरवला हेही आठवण्याचा प्रयत्न केला आणि टेनिस सेंटरमध्ये फोन एका बॅगेत ठेवल्याचे शेवटी तिला आठवले. ती रिकामी पिशवी होती आणि ती आतापर्यंत कचऱ्यात गेली असेल हे तिला माहीत होते. अशा स्थितीत तिने तात्काळ फोनवर कॉल केला मात्र तोपर्यंत फोन बंद झाला होता. आता फोन मिळणे अवघडच आहे,  हे तिला समजले होते. 


पण, लिऊने त्यांच्या टीम लीडरशी संपर्क साधला. पण टीम लीडरसमोर सर्वात मोठा प्रश्न होता की उद्घाटन समारंभाच्या वेळी प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असताना तुम्ही कोणाला फोन शोधायला कसा सांगाल? टीम लीडर जेफ्री एडवर्डसन यांनी लिऊला सांगितले, तू तुझ्या सामन्यावर लक्ष केंद्रित कर आणि मी काहीतरी करेन. काही वेळाने जेफ्री स्वयंसेवकांच्या टीमकडे पोहोचला आणि त्यांना संपूर्ण माहीती सांगितली. रविवारी दुपारी ३ वाजता स्वयंसेवकांना लिऊचा फोन सापडला आणि त्यांनी जेफ्रीला संपर्क साधला. लिऊ आणि जेफ्री यांचा यावर विश्वास बसला नाही.


१०,००० आसनांच्या स्टेडियममध्ये आणि असंख्य कचरा पिशव्यांमधून फोन शोधण्यासाठी स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. हजारोहून अधिक कचरा पिशव्या उघडणे आणि नंतर फोन शोधणे हे सर्वात मोठे काम होते. जेफ्री यांनी या स्वयंसेवकांचे आभार मानले. यानंतर युवा बुद्धिबळपटूने एक व्हिडिओ बनवला आणि सर्व स्वयंसेवकांचे आभार मानले आणि सांगितले की, तुमच्या मेहनतीमुळे मला येथे घरासारखे वाटते.
 

Web Title: Asian Games 2023 : A group of volunteers sifted through tens of thousands of rubbish bags throughout the night and helped 12-year-old Liu Tian-yi, a chess player for Hong Kong, China, find her lost device. 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.