Asian Games 2018: सायना, सिंधूकडून सुवर्ण अपेक्षा, नीरज चोप्रावर नजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 08:31 IST2018-08-27T08:30:32+5:302018-08-27T08:31:02+5:30
Asian Games 2018: आशियाई स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारतीय खेळाडूंकडून सुवर्णपदकांची अपेक्षा आहे

Asian Games 2018: सायना, सिंधूकडून सुवर्ण अपेक्षा, नीरज चोप्रावर नजरा
मुंबई - आशियाई स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारतीय खेळाडूंकडून सुवर्णपदकांची अपेक्षा आहे. बॅडमिंटनमध्ये 1982 नंतर एकेरितील पदक निश्चित करणाऱ्या सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्याकडून ऐतिहासिक कामगिरीची अपेक्षा आहे. दोन्ही खेळाडू महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत. अॅथलेटिक्ममध्ये भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्याकडून सुवर्ण इतिहास लिहिला जावा अशी आस भारतीयांना लागली आहे.
भारतीय खेळाडूंचे आजचे वेळापत्रक
अॅथलेटिक्स
महिला, लांब उडी अंतिम फेरी- नीना वाराकील, नयना जेम्सः सायं. 5.10 वा.
पुरुष, भालाफेक स्पर्धा- नीरज चोप्रा, शिवपाल सिंगः सायं. 5.15 वा.
महिला, 400 मी. अडथळ्याची शर्यत - जौना मुर्मू, अनु राघवनः सायं. 5.15 वा.
पुरुष, 400 मी. अडथळ्याची शर्यत - धरूण अय्यासामी, संतोष कुमारः सायं. 5.30 वा.
पुरुष, उंच उडी - चेतन बाळसुब्रमण्यः सायं. 5.30 वा.
महिला, 3000 मी. स्टीपलचेस - सुधा सिंग, चिंता यादवः सायं. 5.45 वा.
पुरुष, 3000 मी. स्टीपलचेस- शंकर लाल स्वामीः सायं. 6 वा.
पुरुष 800 मी. पात्रता फेरी - जिन्सन जॉन्सन, मनजीत सिंगः सायं. 6.35 वा.
बॅडमिंटन
महिला उपांत्य फेरी - सायना नेहवाल वि. ताय त्झू यिंगः सकाळी 10.30 वा.
महिला उपांत्य फेरी - पी. व्ही. सिंधू वि. अकाने यामागुचीः सकाळी 10.30 वाजल्यानंतर
हॉकी
महिला गट - भारत वि. थायलंडः दुपारी 12.30 वा.