Asian Games 2018: महाराष्ट्राच्या संजीवनीला पदक जिंकण्यात अपयश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 19:18 IST2018-08-25T19:13:25+5:302018-08-25T19:18:04+5:30
Asian Games 2018: महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवला आशियाई स्पर्धेत 10000 मीटर शर्यतीत पदक जिंकण्यात अपयश आले. तिच्यासह भारताच्या सुरिया लोगनाथन हीनेही निराशा केली.

Asian Games 2018: महाराष्ट्राच्या संजीवनीला पदक जिंकण्यात अपयश
जकार्ता - महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवला आशियाई स्पर्धेत 10000 मीटर शर्यतीत पदक जिंकण्यात अपयश आले. तिच्यासह भारताच्या सुरिया लोगनाथन हीनेही निराशा केली. संजीवनी आणि सुरिया यांना अनुक्रमे 9 व 6 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. 10000 मीटर शर्यतीत संजीवनी आणि सुरिया या भारतीय खेळाडूंनी पहिल्या दोन लॅपमध्ये आघाडीवर घेतली होती, परंतु हळुहळू त्या मागे पडल्या. 7000 मीटरपर्यंत भारताच्या दोन्ही खेळाडू अव्वल पाचमधून बाहेर पडल्या होत्या.
नाशिकच्या संजीवनीने खेळाडूने 2012मध्ये तिने या सरावाला सुरूवात केली. आशियाई क्रॉस कंट्री शर्यतीत कांस्यपदक जिंकलेल्या या खेळाडूकडून भरपूर अपेक्षा होत्या. 2017 मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तिने 5000 मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकले होते, तर 10000 मीटरमध्ये तिला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये प्रशिक्षक विजेंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली सराव करणाऱ्या संजीवनीने 2013 मध्ये पहिल्या आशियाई शालेय अॅथलेटिक्स स्पर्धेत तीन पदकांची कमाई केली होती.