शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

Asian Games 2018 Live : बजरंगची सुवर्ण श्रद्धांजली, अटलबिहारी वाजपेयींना 'गोल्ड' समर्पित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 9:48 PM

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे आजपासून आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 ला धुमधडाक्यात सुरुवात झाली. या स्पर्धेच्या धमाकेदार सोहळ्यात दिमाखात तिरंगा फडकला आहे. 18 व्या आशियाई स्पर्धेचा हा उद्घाटन सोहळा...

जकार्ता - भारताच्या बजरंग पुनियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. बजरंगने कुस्तीतील 65 किलो वजनीगटात सुवर्णपदक पटकावले आहे. भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी भारताचा गोल्डमन बजरंग पुनियाचे अभिनंदन केले आहे. आशियाई स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक असल्यामुळे हे अतिशय खास आहे, अशा शब्दात मोदींनी बजरंगचे कौतूक केले. त्यानंतर, बजरंगनेही धन्यवाद सर असा रिप्लाय मोदींच्या ट्विटला  दिला आहे.

 

भारतीय मल्ल आणि आशियाई स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण मिळवून देणाऱ्या बजरंगने आपले सुवर्णपदक दिवंगत भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केलं आहे. बजरंगने ट्विट करुन अटलजींना वंदन असेही म्हटले आहे. 

 

भारताच्या महिला हॉकी संघाने इंडोनेशियावर 8-0 असा विजय मिळवला

 

 

भारताच्या पुरुष कबड्डी संघाने बांगलादेशनंतर श्रीलंकेवरही दमदार विजय मिळवला. भारताने श्रीलंकेला 44-28 असे पराभूत केले.

 

 

 

 

संदीप तोमरला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का

 

 

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे आजपासून आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 ला धूमधडाक्यात सुरुवात झाली. भारताने या स्पर्धेतील आपले खाते कांस्यपदकाने उघडले आहे. 10 मीटर एअर रायफल मिक्स्ड स्पर्धेत भारताला मिळालं कांस्यपदक, अपूर्वी चंदेला आणि रवी कुमारनं मिश्र दुहेरीत कांस्यपदक मिळवलं. 10 मीटर एअर रायफल मिक्स्ड स्पर्धेत भारताचा अपूर्वी चंदेला आणि रवीकुमार ही जोडी अंतिम फेरीत दाखल, भारतीय संघानं 835.3 पॉइंट्स मिळवले. रवी कुमारला 420.0 आणि अपूर्वीने 415.3 पॉइंट्स मिळवले. भाराताचा दिग्गज कुस्तीपटू सुशील कुमारला पहिल्याच लढतीत पराभवाचा सामना करावा लागला, तर बजरंग पुनिया आणि संदीप तोमर यांनी विजयासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला

 

या स्पर्धेच्या धमाकेदार सोहळ्यात दिमाखात तिरंगा फडकला. 18व्या आशियाई स्पर्धेचा हा उद्घाटन सोहळा बुंग कार्णो स्टेडियममध्ये 50 हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत नृत्य, गाणे आणि आतषबाजीच्या नयनरम्य कलाविष्कारात पार पडला. भारतीय भाला फेक एथलिट नीरज चोपडा याने 572 सदस्यीय भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. यावेळी नीरजच्या हातात बुंग कार्णो स्टेडियममध्ये दिमाखात तिरंगा फडकत होता. नीरजच्या पाठीमागे भारतीय संघाचे प्रमुख बृजभूषण शरण आणि इतर भारतीय खेळाडू होते.

Live Upadate - 

-भारताचा अनुभवी पैलवान सुशील कुमारचा पुरुषांच्या 74 किलोग्रॅम स्पर्धेतल्या क्वालिफिकेशन राऊंडमध्ये पराभव - 10 मीटर एअर रायफल मिक्स्ड स्पर्धेत भारताला मिळालं कांस्यपदक, अपूर्वी चंदेला आणि रवी कुमारनं मिश्र दुहेरीत कांस्यपदक मिळवलं. - 10 मीटर एअर रायफल मिक्स्ड स्पर्धेत भारताचा अपूर्वी चंदेला आणि रवीकुमार ही जोडी अंतिम फेरीत दाखल, भारतीय संघानं 835.3 पॉइंट्स मिळवले. रवी कुमारला 420.0 आणि अपूर्वीने 415.3 पॉइंट्स मिळवले. - 10 मीटर एअर रायफल मिक्स्ड टीमचा क्वालिफिकेशन राऊंड सुरू, भारताचा अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार ही जोडी 835.3 पॉइंट्सनं दुस-या स्थानी, भारताला पदकाची आशा- भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव- भारतीय महिला कबड्डी टीम 41-12 पुढे खेळतेय- पहिल्या हाफनंतर भारतीय महिला कबड्डी टीम 19-8नं पुढे- भारतीय महिला टीम जपानहून 13-7ने पुढे- भारताचा जलतरणपटू सौरभ सांगवेकर दुसऱ्या स्थानी, 1:54:87 वेळेत अंतर केलं पार.- इंडोनेशियाची माजी बॅडमिंटन खेळाडू सुसी हिने आशियाई स्पर्धेची मशाल पेटवली. मशाल पेटवल्यानंतर इंडोनेशियन संस्कृतीची झलक विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून येत आहे. आशियाई स्पर्धेतील उद्घाटन सोहळ्यात दाझलिंग शो आकर्षक ठरला असून विद्युत रोषणाईने स्टेडियम उजाळल्याचे पाहायला मिळाले. स्टेडियमध्ये सर्वत्र विद्युत रोषणाई दिसून आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही इंडोनेशियामध्ये होत असलेल्या 18 व्या आशियाई स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी ट्वीट करताना, 'भारतीय संघाला इंडोनेशियातील आशियाई स्पर्धेसाठी शुभेच्छा। देशातील सर्वच भारतीयांना आमच्या खेळाडूंचा अभिमान आहे. तसेच या स्पर्धेत आमच्या खेळाडूंचे प्रदर्शन सर्वोत्कृष्ठ राहील, अशी आशा आम्हाला आहे, असे मोदींनी म्हटले आहे.

टॅग्स :Asian Games 2018आशियाई स्पर्धाNarendra Modiनरेंद्र मोदी