Asian Games 2018 : मलेशियाला हरवणे असंभव नाही- दीपिका पल्लीकल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 21:01 IST2018-08-30T21:01:21+5:302018-08-30T21:01:55+5:30
खापतीमुळे पहिल्या सामन्यात मला गती ठेवता आली नाही. तरी मी एक सेट जिंकला, पण सामना जिंकू शकले नाही याचे खंत आहे, असे दीपिकाने सांगितले.

Asian Games 2018 : मलेशियाला हरवणे असंभव नाही- दीपिका पल्लीकल
जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : मलेशियाचा संघ जरी फॉर्ममध्ये असला तरी त्यांना उपांत्य फेरीत पराभूत करण्यास आम्ही सक्षम आहोत, असे मत भारताची स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकलने व्यक्त केले.
दीपिका म्हणाली की, " शेवटच्या साखळी सामन्यात हाँगकाँगविरुद्ध आमचा खेळ चांगला झाला नाही. आम्ही थोडे कमी पडलो. हाँगकाँगच्या खेळाडूने उत्तम कामगिरी केली. दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात मला गती ठेवता आली नाही. तरी मी एक सेट जिंकला, पण सामना जिंकू शकले नाही याचे खंत आहे."
दीपिकाने जोश्ना चिनाप्पाच्या खेळाबद्दल सांगितले की, "जोश्ना चिनाप्पाचा आज दिवस नव्हता, ती सरळ सेट्स मध्ये हरली. ही गोष्ट फार कमी वेळा होते. उपांत्य फेरीमध्ये नक्कीच चांगली कामगिरी करू," असा मला विश्वास आहे.