Asian Games 2018: भारताच्या विकास कृष्णनने पाकिस्तानी खेळाडूला नमवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 15:22 IST2018-08-27T15:21:45+5:302018-08-27T15:22:21+5:30

Asian Games 2018: भारताच्या विकास कृष्णनने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

Asian Games 2018: India's Vikas Krishnan defeats Pakistani player | Asian Games 2018: भारताच्या विकास कृष्णनने पाकिस्तानी खेळाडूला नमवले

Asian Games 2018: भारताच्या विकास कृष्णनने पाकिस्तानी खेळाडूला नमवले

जकार्ता - भारताच्या विकास कृष्णन याने 75 किलो वजनी गटाच्या बाद फेरीत पाकिस्तानच्या अहमद तन्वीरचा 5-0 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. विकासने या लढतीत जोरदार ठोसे लगावले. त्याच्या आक्रमणासमोर पाकिस्तानी खेळाडूचा निभाव लागला नाही.



2010च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या विकासने या सामन्यात एकहाती वर्चस्व गाजवले. त्याने आक्रमणाबरोबरच बचावातही उत्तम खेळ केला. 

Web Title: Asian Games 2018: India's Vikas Krishnan defeats Pakistani player