शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदासाठी अनुराग ठाकूर सज्ज

By admin | Updated: May 22, 2016 02:45 IST

शशांक मनोहर यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, नवा अध्यक्ष कोण? या चर्चांना रविवारी पूर्णविराम मिळणार आहे

मुंबई : शशांक मनोहर यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, नवा अध्यक्ष कोण? या चर्चांना रविवारी पूर्णविराम मिळणार आहे. विशेष म्हणजे, बीसीसीआयची सूत्रे आपल्याकडे घेण्यासाठी विद्यमान सचिव अनुराग ठाकूर जवळजवळ सज्ज आहेत. रविवारी मुंबईत होणाऱ्या बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण बैठकीमध्ये (एसजीएम) बिनविरोधपणे अध्यक्ष म्हणून निवडून येण्यास ठाकूर तयार आहेत.सध्या सचिव म्हणून बीसीसीआयची धुरा सांभळत असलेले ठाकूर यांना पूर्व विभागाकडून अध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळणार असून, या पदासाठी आता पूर्व विभागाचा क्रमांक आहे. त्यामुळे ठाकूर यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी असल्याचे स्पष्ट आहे. विशेष म्हणजे, लोढा समितीच्या शिफारशींना लागू करण्याचा दबाव बीसीसीआयवर असताना ४१ वर्षीय ठाकूर या पदाचा कारभार सांभाळतील. (वृत्तसंस्था)

युवा अध्यक्ष होणारअनुराग ठाकूर यांच्या बीसीसीआय अध्यक्षपदी औपचारिक घोषणा बाकी राहिली असताना उद्या बीसीसीआयच्या इतिहासामध्ये विशेष नोंदही होईल. ठाकूर हे अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असून, रविवारी त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ते आतापर्यंतचे सर्वात युवा बीसीसीआय अध्यक्ष होतील.

म्हणून दिला राजीनामामुंबई : काहीदिवसांपूर्वीच बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या शशांक मनोहर यांनी आपली आपली भूमिका स्पष्ट करताना, ‘‘न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यास मी असक्षम होतो आणि बीसीसीआयचा ढाचा कोसळताना मी पाहू शकत नाही.’’ असे धक्कादायक वक्तव्य केले. आयसीसीचे पहिले स्वतंत्र चेअरमनपद झाल्यानंतर मनोहर यांनी सांगितले की ‘‘लोढा समितीच्या आधीही मी जे काही केले ते बोर्डच्या हितासाठी केले. लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यास मी सक्षम नाही. या बोर्डमध्ये माझ्याहून अनेक असे सक्षम व्यक्ती आहेत, जे या शिफारशी लागू करून घेऊ शकतात.