शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

आनंद-कार्लसन डाव बरोबरीत

By admin | Updated: November 13, 2014 01:55 IST

शेवटर्पयत विलक्षण चुरशीने खेळला गेलेला चौथा डाव अखेर बरोबरीत सुटला आणि सर्वानाच चुटपूट लागल्यासारखे वाटलं.

जयंत गोखले
शेवटर्पयत विलक्षण चुरशीने खेळला गेलेला चौथा डाव अखेर बरोबरीत सुटला आणि सर्वानाच चुटपूट लागल्यासारखे वाटलं. विश्वविजेता आणि जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू मॅग्नर्स कार्लसन आणि माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांच्यातील जागतिक अजिंक्यपद स्पर्धा प्रचंड उत्कंठावर्धक होऊ 
लागली आहे. 
दुस:या डावात काळी मोहरी घेऊन खेळताना आनंदने बर्लिन बचावाचा अवलंब केला होता; पण त्याची योजना पूर्णपणो यशस्वी होऊ शकली नाही. दुस:या डावातील पराभवाचा वचपा आनंद ज्या प्रकारे कालच्या डावात काढला. त्यावरून या लढतीतले पुढचे सामने किती रंगतदार होणार याची चुणूक आपण पाहिलीच.
आनंदने आज अखेर त्याच्या आवडत्या सिसीलीयन बचावाचा वापर केला. विविध बुद्धिबळतज्ज्ञदेखील आनंदने या बचावाचा वापर करावा, या मनाचे होते. कालच्या विजयामुळे आनंदला आवश्यक असलेला आत्मविश्वास मिळाला आणि आज त्याने कार्लसनला उघड-उघड आव्हान दिले. बुद्धिबळप्रेमी आणि अभ्यासकांची निराशा करत कार्लसनने आनंदचे आव्हान स्वीकारले नाही आणि डावाला एका रटाळ अशा पद्धतीत नेले. अशा प्रकारच्या योजना कार्लसनला खूप आवडतात आणि मागच्या वेळच्या अनुभव लक्षात घेता आनंद या प्रकारात कच खातो, असा असलेला कार्लसनचा होरा हे यामागचे गुपित होते.
उद्या सुट्टीचा दिवस आहे आणि नंतरच्या डावात आनंद पांढरी मोहरी घेऊन खेळणार आहे. आता आनंदच्या झंझावाताला कसे तोंड द्यायचे, हा प्रश्न कार्लसनला पडला असेल.
 
च्आज मात्र आनंदने सुरुवातीपासूनच आक्रमक धोरण ठेवून कार्लसनला गोंधळून टाकण्यात यश मिळविले. सिसीलीयनमधून फ्रेंचतराशमध्ये रूपांतरित झालेल्या ओपनिंगमधून आनंदने वजिराच्या पट्टीत आयसोलेटेड प्यादे स्वत:कडे घेतले आणि त्याच्याभोवती आपल्या सर्व मोह:यांची सुंदर व्यूहरचना केली.  
 
च्कार्लसनने विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले; पण आनंदचा प्रतिहल्ला इतका अचूक आणि प्रखर होता, की कार्लसनची डाळ अजिबात शिजू शकली नाही. नंतर तर आनंदनेच एका प्याद्याचा बळी घेऊन विजयासाठी प्रयत्न सुरू केले होते. 
च्तेव्हा मात्र कार्लसनने आपल्या महत्त्वाकांक्षेला मुरड घातली आणि आनंदच्या राजाला सतत शह देऊन 47 व्या चालीला डाव बरोबरीत सोडविला. 12 डावांच्या लढतीत चौथ्या डावाअखेर दोन्ही खेळाडू प्रत्येकी दोन गुणांवर आहेत.