इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर मध्यपूर्वेतील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली. सुरक्षा कारणास्तव या भागातील हवाई क्षेत्र बंद करण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक पूर्णपणे कोलमडली असून भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधू दुबईत, तर भारतीय पुरुष बास्केटबॉल संघ कतारमध्ये अडकला आहे.
दोनवेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू ३ मार्चपासून सुरू होणाऱ्या ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेसाठी बर्मिंगहॅमला जात होती. दुबई हे तिचे ट्रान्झिट पॉइंट होते. मात्र, तिथे पोहोचताच युद्ध सुरू झाल्याने ती अडकून पडली. सिंधूने दुबई विमानतळाचा व्हिडिओ शेअर करत पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व उड्डाणे निलंबित करण्यात आल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, सिंधू विमानतळावर असतानाच जवळच एक स्फोट झाला, ज्यातून ती थोडक्यात बचावली. सध्या तिला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असले तरी, तिचे स्पर्धेत खेळणे आता अशक्य मानले जात आहे.
केवळ सिंधूच नाही, तर भारताचा वरिष्ठ पुरुष बास्केटबॉल संघ देखील कतारची राजधानी दोहा येथे अडकला आहे. हा संघ 'एफआयबीए बास्केटबॉल विश्वचषक २०२७' च्या आशियाई पात्रता फेरीसाठी तिथे गेला होता. हवाई क्षेत्र बंद झाल्याने संघाचा पुढील प्रवास थांबला असून खेळाडूंच्या सुरक्षिततेची चिंता व्यक्त केली जात आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, दुबई आंतरराष्ट्रीय आणि अल मकतूम विमानतळावरील सर्व कामकाज पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहे. एमिरेट्स, फ्लायदुबई आणि एतिहाद एअरवेजने आपली सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत. भारतातून जाणारी आणि येणारी साधारण ३५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना विमानतळावर न येण्याचे आवाहन केले आहे. विमानतळे बंद झाल्याने जागतिक स्तरावर प्रवाशांची मोठी कोंडी झाली आहे. अनेक भारतीय प्रवासी दुबई आणि अबू धाबी विमानतळावर अडकले असून त्यांना रिबुकिंगसाठी ताटकळत राहावे लागत आहे.
Web Summary : Middle East tensions disrupt travel, stranding PV Sindhu in Dubai en route to the All England Open. The Indian basketball team is also stuck in Doha. Flights are canceled, impacting numerous travelers worldwide, including many Indians.
Web Summary : मध्य पूर्व में तनाव के कारण यात्रा बाधित, पीवी सिंधु ऑल इंग्लैंड ओपन के रास्ते में दुबई में फँसी। भारतीय बास्केटबॉल टीम भी दोहा में फँसी। उड़ानें रद्द, दुनिया भर के कई यात्री प्रभावित, जिनमें कई भारतीय शामिल हैं।