शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

अक्षर पटेलची भारतीय संघात निवड

By admin | Updated: October 15, 2014 04:29 IST

इंडियन प्रीमिअर लीग व चॅम्पियन्स लीगमध्ये चमकदार कामगिरी करणारा फिरकीपटू अक्षर पटेलची वेस्ट इंडीजविरुद्धच्या आगामी दोन वन-डे व एकमेव टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी भारतीय संघात निवड झाली

नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीग व चॅम्पियन्स लीगमध्ये चमकदार कामगिरी करणारा फिरकीपटू अक्षर पटेलची वेस्ट इंडीजविरुद्धच्या आगामी दोन वन-डे व एकमेव टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी भारतीय संघात निवड झाली. ईशांत शर्माला दुखापतग्रस्त मोहित शर्माच्या स्थानी १५ सदस्यांच्या संघात कायम ठेवण्यात आले आहे. आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यापूर्वीच्या तीन वन-डे सामन्यांसाठीही त्याची निवड झाली नव्हती. त्या वेळी त्याला विश्रांती देण्यात आली असल्याचे ‘बीसीसीआय’तर्फे स्पष्ट करण्यात आले होते. धर्मशाला येथे १७ आॅक्टोबरला आणि कोलकाता येथे २० आॅक्टोबरला होणाऱ्या चौथ्या व पाचव्या वन-डे सामन्यांसाठी संघात बदल करण्यात आलेला नाही. पण, २२ आॅक्टोबरला कटक येथे होणाऱ्या टी-२० सामन्यासाठी संजू सॅमन्सन, मनीष पांडे व कर्ण शर्मा यांच्यासह काही नव्या दमाच्या खेळाडूंना १४ खेळाडूंच्या संघात स्थान देण्यात आलेले आहे. अक्षर व पांडे यांना टी-२० संघात धवल कुलकर्णी व अंबाती रायडू यांच्या जागी स्थान देण्यात आलेले आहे. कुलकर्णी व रायडू यांचा इंग्लंड दौऱ्यात टी-२० संघात समावेश होता. अक्षरने यंदा जून महिन्यात बांगलादेश दौऱ्यात तीन वन-डे सामने खेळले होते. त्यात त्याला केवळ एक बळी घेता आला. पण, अलीकडेच संपलेल्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेत तो दुसरा सर्वाधिक यशस्वी फिरकीपटू ठरला. त्याने पाच सामन्यांत ८ बळी घेतले. कर्नाटकचा फलंदाज मनीष पांडे याला अद्याप आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली नाही. त्याने आयपीएलमध्ये शतकी खेळी केली आहे. त्याने आजतागायत १०६ टी-२० सामन्यांत २३७३ धावा फटकाविल्या आहेत.भारत आणि विंडीज संघांदरम्यान सुरू असलेली पाच वन-डे सामन्यांची मालिका सध्या १-१ ने बरोबरीत आहे. कॅरेबियन संघाने कोची येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात विजय मिळविला, तर भारतीय संघाने नवी दिल्ली येथे खेळल्या गेलेल्या लढतीत सरशी साधत मालिकेत बरोबरी साधली. विशाखापट्टणममध्ये खेळला जाणारा तिसरा सामना हुडहूड चक्रीवादळामुळे रद्द करण्यात आला. (वृत्तसंस्था)