शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

आकांक्षा व्होरा, हृतिका श्रीरामचा सुवर्णसह विक्रम

By admin | Updated: February 7, 2015 01:42 IST

४०० मीटर फ्रीस्टाइल आणि डायव्हिंगमध्ये नवीन विक्रमासह सुवर्णपदक जिंकून ३५ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांचा धडाका कायम ठेवला.

राष्ट्रीय स्पर्धा : सौरभ, ज्योत्स्ना, सिमरनला रौप्य; महाराष्ट्र पदक तालिकेत दुसऱ्या क्रमांकावरतिरुअनंतपूरम : महाराष्ट्राच्या आकांक्षा व्होरा व हृतिका श्रीरामने जलतरण प्रकारात अनुक्रमे ४०० मीटर फ्रीस्टाइल आणि डायव्हिंगमध्ये नवीन विक्रमासह सुवर्णपदक जिंकून ३५ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांचा धडाका कायम ठेवला. दुसरीकडे पुरुषांच्या ४०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात सौरभ सांगवेकरला व ५० मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात ज्योत्स्ना पानसरेला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. शुक्रवारी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून पदक तालिकेत एकूण ७४ पदकांसह आपल्या संघाला दुसऱ्या क्रमांकावर ठेवून पोहोचविले. (वृत्तसंस्था)च् महिलांच्या आकांक्षा व्होराने महिलांच्या ४०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात ४:३२.५० वेळेची नोंद करून नवीन विक्रमांसह सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. या प्रकारात कर्नाटकच्या मालविकाला रौप्य, तर मध्य प्रदेशच्या रिचा मिश्राला कांस्यपदक मिळाले. च्डायव्हिंग प्रकारात महाराष्ट्राच्या हृतिका श्रीरामने १८७.३५ गुण संपादन करून नवीन विक्रमासह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. याच प्रकारात महाराष्ट्राच्या सिमरनने १८७.२० गुण मिळवून रौप्यपदक जिंकले. पश्चिम बंगालच्या तनुका धाराला १४२.२५ गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. च्महिलांच्या ५० मीटर बॅक स्ट्रेक प्रकारात महाराष्ट्राच्या ज्योत्स्ना पानसरेने ३१.३६ सेकंदांची वेळ नोंदवून रौप्यपदक जिंकले. तिने जुन्या विक्रमाची बरोबरी केली. गुजरातच्या मन्ना पटेलने नवीन विक्रमासह (३०.६८) सुवर्णपदक जिंकले.च्पुरुषांच्या ४०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात मात्र महाराष्ट्राच्या सौरभ सांगवेकरला ३:५९.७० सेकंदासह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या प्रकारात केरळच्या साजन प्रकाशने (३:५७.१६) सुवर्णपदक जिंकले. केरळच्या आनंदने कांस्यपदक जिंकले. चैनसिंगला पराभूत करून स्वप्निलने जिंकले रौप्यमहाराष्ट्राच्या स्वप्निल कुसाळेने आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्या चैनसिंगला ५० मीटर रायफल थ्री पोझीशन प्रकारात पराभूत करून रौप्यपदक जिंकून खळबळ उडवून दिली. नाशिक येथील क्रीडा प्रबोधिनीत प्रशिक्षण घेत असलेल्या स्वप्निलने ४५५.६ गुणांचे लक्ष साधले. सेनादलाच्या सत्येंद्ररसिंगने ४५६ गुण मिळवून सुवर्ण तर चैनसिंगने ४३४.९ गुण मिळवून कांस्यपदक जिंकले.मोठ्या स्पर्धांमध्ये प्रत्येक खेळाडूवर थोडे तरी दडपण असते. या स्पर्धेमध्ये भारतातील दिग्गज नेमबाज सहभागी झाले आहेत. चैनसिंगसारखा प्रतिस्पर्धी समोर असताना मानसिक तणाव असणार पण आजची माझी खेळी उत्कृष्ट झाली.- स्वप्निल कुसाळे