अजयला खेलो इंडियात सुवर्णपदक, कोल्हापूरातील पहिलाच मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 22:02 IST2023-02-11T22:01:58+5:302023-02-11T22:02:30+5:30

तेलंगणाच्या निखिल कुमार याचा ५-४ असा पराभव करुन अंतिम फेरी गाठली.

Ajay wins gold medal in Khelo India, Kolhapur's first | अजयला खेलो इंडियात सुवर्णपदक, कोल्हापूरातील पहिलाच मानकरी

अजयला खेलो इंडियात सुवर्णपदक, कोल्हापूरातील पहिलाच मानकरी

- दत्ता पाटील 

म्हाकवे  :  भोपाळ (मध्यप्रदेश) येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्स या स्पर्धेत आणूर (ता.कागल) येथील अजय बाबासाहेब कापडे यांने ६५किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावत.त्याने कोल्हापूरला सुवर्णपदक मिळवून दिले. 

तेलंगणाच्या निखिल कुमार याचा ५-४ असा पराभव करुन अंतिम फेरी गाठली. मात्र, अजय समोर दिल्लीच्या आकाश कुमार याचे बलदंड आव्हान होते. परंतु, अजयने कौशल्य पणाला लावून पहिल्या दोन मिनिटांच्या फेरीतच त्याने ३-१ अशी आघाडी घेतली. हीच आघाडी त्याच्यासाठी निर्णायक ठरली. तेलंगणाच्या निखिल कुमार याचा ५-४ असा पराभव केला. अंतिम फेरीत अजयपुढे दिल्लीच्या आकाश कुमार याचे आव्हान होते.

पहिल्या दोन मिनिटांच्या फेरीत त्याने ३-१ अशी आघाडी घेतली होती. हीच आघाडी त्याच्यासाठी निर्णायक ठरली. त्याने ५-२अशी आघाडी  घेवून त्याने सुवर्णपदकावर नाव कोरले. सध्या तो विजयकाका बराटे व दिलीप पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे (पुणे) येथील सह्याद्री संकुलनात सराव करत आहे.त्याला उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील, वस्ताद शिवाजीराव जमनिक, तुकाराम चोपडे, प्रभाकर कापडे यांचे मार्गदर्शन लाभले.
 

Web Title: Ajay wins gold medal in Khelo India, Kolhapur's first