शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

कडव्या झुंजीनंतर सातवा डाव बरोबरीत

By admin | Updated: November 18, 2014 00:59 IST

विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत आज काळ्या मोहरीने खेळत असलेल्या भारताच्या विश्वनाथन आनंद १२२ चालींपर्यंत कार्लसनला झुंज देत डाव बरोबरीत सोडविला.

जयंत गोखले, विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत आज काळ्या मोहरीने खेळत असलेल्या भारताच्या विश्वनाथन आनंद १२२ चालींपर्यंत कार्लसनला झुंज देत डाव बरोबरीत सोडविला. ७ व्या फेरी अखेर कार्लसन ४ गुणांवर तर आनंद ३ गुणांवर आहे. उद्या आनंद पांढऱ्या मोहोऱ्यांनी खेळणार आहे.जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतील ७ वा डाव आज कार्लसनने राजाच्या पुढील प्यादे २ घरे सरकवून सुरू केला. आनंदने या डावात काल खेळल्या गेलेल्या सिसिलियन बचावाचा अवलंब न करता आपल्या जुन्या हत्याराचा म्हणजे बर्लिन बचावाचा वापर केला. आनंदच्या ओपनिंगचा पर्याय बघून तमाम बुद्धिबळ रसिकांची निराशा झाली असणार. २000 सालच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ब्लादिमीर क्रॅमनिकने याचा यशस्वीपणे उपयोग करून त्या वेळच्या जगज्जेता कास्पारोव्हला पराभूत केले होते. परंतु त्यानंतर या पद्धतीबाबत एवढे अफाट संशोधन करण्यात आले, की त्यामुळे त्याची लोकप्रियता अजूनच वाढली.आनंद आणि कार्लसन दोघांनीही कालच्या विश्रांतीच्या दिवसाचा सदुपयोग केल्याचे जाणवत होते. कारण त्यांच्या पहिल्या १५-१७ चाली इतक्या पटापट खेळल्या गेल्या, की जणू आपण जलदगती डावच बघायला बसलोय, असा भास झाला.अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी नाशिकयेथे अनिश गिरी विरुद्ध राजदाबोव्ह या ग्रॅँडमास्टर्स मध्ये याच चालींनी खेळला गेलेला डाव या दोघांच्या अभ्यासात नक्की आला असणार. २३ व्या चालीनंतर मात्र कार्लसनने स्वत:चा वेगळा रस्ता तयार केला आणि इथून पुढे डावात रंगत निर्माण झाली. ८ व्या चालीलाच वजिरा-वजिरी होत असलेली पद्धत आनंदने का निवडली असावी, हे एक गूढच आहे. कारण या पद्धतीत काळ्या मोहऱ्याने खेळणाऱ्याला बरोबरीशिवाय जास्त काही मिळत नाही.