शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

आदिती महाजनचे दिमाखदार तिहेरी मुकुट

By admin | Updated: June 7, 2015 00:39 IST

जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत आदिती महाजन हिने तीन गटातून विजेतेपद पटकावत तिहेरी मुकूट संपादन केला. प्रथमेश हलणकर

पुणे : जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत आदिती महाजन हिने तीन गटातून विजेतेपद पटकावत तिहेरी मुकूट संपादन केला. प्रथमेश हलणकर, स्वराली चिटणीस व सिध्दी महाजन यांनी दोन गटाचे विजेतेपद मिळवत दुहेरी मुकूटाला गवसणी घातली. क्लब सोलारीस क्लबच्या मयुर कॉलनी कोथरूड येथील बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या स्पर्धेच्या १९ वर्षाखालील मुलीच्या गटात आदिती महाजनने ऋचा कुलकर्णीचा १९-२१, २१-१३, २१-१७ असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद संपादन केले. मुलींच्या १५ वर्षाखालील गटात दुहेरीत आदिती महाजनने सिध्दी महाजन हिच्या साथीत सारीका गोखले व इरा उंबरजे या जोडीचा २१-१६, २१-१६ असा पराभव केला. मुलींच्या १७ वर्षाखालील दुहेरीत आदिती व सिध्दी महाजन या जोडीने स्वराली चिटणीस-इशा जगताप यांचा २१-१४, २१-१५ असा पराभव करीत अजिंक्यपद पटकावले. मुलींच्या १५ वर्षाखालील गटात स्वराली चिटणीसने आदिती महाजनचा २१-१६, २१-१७ असा पराभव करून विजेतेपद मिळवले. मुलींच्या १९ वर्षाखालील दुहेरीमध्ये स्वराली चिटणीसने इशा जगतापच्या साथीत ऋचा कुलकर्णी व उन्नती मुनोत यांचा २२-२०, २१-२० असा पराभव केला.मुलांच्या १५ वर्षाखालील गटात प्रथमेश हलणकर याने ओंकार लोणकरचा १३-२१, २१-१६, २१-१८ असा पराभव केला. तर १५ वर्षाखालील दुहेरीमध्ये प्रथमेश हलणकर व ए.राणे यांनी आयुष खांडेकर-सस्मित पाटील यांचा २१-१६, २२-२० असा पराभव केला. प्रथम वाणी, दर्शन पुजारी, सोहम कुलकर्णी, कुणाल वाघमारे, श्रीया उत्पत, ऋचा सावंत व ऋचा कुलकर्णी यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आपापल्या गटाचे विजेतेपद संपादन केले.